Sex दरम्यान 'स्टेल्थिंग' म्हणजे काय? अनेक देशात 'स्टेल्थिंग'ला बलात्कार म्हटलं जातंय?

क्रिस्टीना गार्सिया 2017 पासून स्टेल्थिंगचा कायदा करण्यासाठी काम करत आहे.

Updated: Dec 9, 2021, 03:28 PM IST
Sex दरम्यान 'स्टेल्थिंग' म्हणजे काय? अनेक देशात 'स्टेल्थिंग'ला बलात्कार म्हटलं जातंय? title=

मुंबई : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या विधानसभेने स्टेल्थिंगवर बंदी घातली आहे, म्हणजे 'तुमच्या जोडीदाराच्या संमतीशिवाय सेक्स दरम्यान कंडोम काढणं'. डेमोक्रॅट सदस्या क्रिस्टीना गार्सिया या कायद्यासाठी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत होत्या. हे विधेयक विधानसभेत मांडणाऱ्या गार्सिया म्हणाल्या, "कॅलिफोर्नियामध्ये असं करणं गुन्हा असल्याचे आता स्पष्ट झालं आहे."

गार्सिया यांच्या सांगण्यानुसार, "देशातील हा अशा प्रकारचा पहिला कायदा आहे. मी उर्वरित राज्यांना कॅलिफोर्नियाच्या मार्गाचे अनुसरण करण्याचं आवाहन करते आणि हे स्पष्ट करते की स्टेल्थिंग करणं केवळ अनैतिक नाही तर बेकायदेशीर देखील आहे."

क्रिस्टीना गार्सिया 2017 पासून स्टेल्थिंगचा कायदा करण्यासाठी काम करत आहे. त्यावेळी विद्यार्थिनी असलेल्या अलेक्झांड्रा ब्रॉडस्कीचा एक अहवाल 'कोलंबिया जर्नल ऑफ जेंडर अँड लॉ'मध्ये प्रसिद्ध झाला होता. या कायद्यासाठी जनजागृती करण्याचं श्रेय या अहवालालाच दिलं जातंय.

स्टेल्थिंग म्हणजे नेमकं काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर, स्टेल्थिंग म्हणजे कंडोम काढणं, सेक्स करताना जाणूनबुजून पार्टनरला न सांगता नुकसान करणं. असं केल्याने जोडीदाराला लैंगिक संक्रमित रोग होण्याचा किंवा गर्भवती होण्याचा धोका असतो. 

2019 मध्ये नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका पत्रात, 21 ते 30 वयोगटातील 12% महिलांनी स्टेल्थिंगचा अनुभव सांगितला. त्याच वर्षी, ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांना आढळले की 33% स्त्रिया आणि 20% पुरुष पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवताना स्टेल्थिंग करतात. 2019 च्या आणखी एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, जवळजवळ 10% पुरुषांनी जोडीदाराच्या संमतीशिवाय सेक्स दरम्यान कंडोम काढलं होतं.

कायदा काय सांगतो?

ज्या देशांनी स्टेल्थिंगचा सामना करण्याचा प्रयत्न केला त्यांनी यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला आहे. हा कॅलिफोर्निया कायदा यूएस मधील अशा प्रकारचा पहिला आहे जो स्टेल्थिंगला प्रत्यक्षात गुन्हा ठरवत नाही. त्याऐवजी स्टेल्थिंग केल्यास सर्वसाधारण शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. 

लैंगिक अत्याचारापासून ते बलात्कारापर्यंतचे गुन्हे यासाठी नोंदवल्यानंतर निवडक प्रकरणांमध्येच खटले यशस्वी होतात.

एका जर्मन पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या जोडीदाराच्या संमतीशिवाय कंडोम काढल्याबद्दल लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना आठ महिन्यांची निलंबित कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच पीडितेच्या लैंगिक आरोग्याची तपासणी करण्यासाठी 96 युरो (8,300 रुपये) आणि नुकसान म्हणून 3,000 युरो (2.62 लाख रुपये) दंडही ठोठावण्यात आला.

न्यूझीलंडमध्ये यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला एका पुरुषाला एका सेक्स वर्करकडून स्टेल्थिंग केल्याप्रकरणी बलात्काराचा दोषी ठरवण्यात आला होता. यासाठी त्याला तीन वर्षे नऊ महिन्यांची शिक्षा झाली.

त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये स्टेल्थिंग हा बलात्कार मानला जातो. मात्र, यासाठी कोणताही विशिष्ट कायदा नाही. 2019 मध्ये, एका पुरुषाला सेक्स वर्करकडून स्टेल्थिंग केल्याबद्दल बलात्काराचा दोषी ठरवण्यात आला. सेक्स वर्करने आरोपीला कंडोम घालण्याची विनंती केली होती. आरोपीचे कंडोम काढल्यामुळे सेक्स वर्करची सशर्त संमती नाकारून न्यायालयाने या संबंधाला बलात्कार असल्याचं म्हटलं.

2014 मध्ये कॅनडा आणि 2017 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये लैंगिक छळाचा यशस्वी खटला चालवण्यात आला.