कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात केस पांढरे, कशी घ्यावी काळजी?
अकाली पांढरे होणारे केस ही समस्या आजकाल अनेकांना भेडसावत असते, विशेषतः तरुणांमध्ये. 25 ते 30 वर्षांच्या वयोगटातील तरुणांमध्ये हा त्रास सर्वाधिक दिसून येतो.
Vitamin C Deficiency May Leads To White Hair: केस पांढरे होणे केवळ सौंदर्यावर परिणाम करत नाही तर आत्मविश्वासावरही परिणाम करते. परंतु हे का घडते आणि यामागे नेमकी कोणती कारणे असतात, याबद्दल अनेकांना माहिती नसते. चुकीची जीवनशैली, अपूर्ण आहार, अनुवांशिकता किंवा काही विशिष्ट पोषणतत्त्वांची कमतरता यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते.
व्हिटॅमिन सीची कमतरता:
अकाली पांढरे केस होण्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता. व्हिटॅमिन सी, ज्याला एस्कॉर्बिक ॲसिड म्हणतात. शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे कोलेजन तयार होते. जे केसांना मजबूत बनवण्याबरोबरच त्यांना पांढरे होण्यापासून रोखते. तसेच यामुळे केस गळती, कोरडेपणा आणि इतर समस्या कमी होतात. व्हिटॅमिन सीची कमतरता असलेल्या लोकांमध्ये केस पांढरे होण्याची शक्यता अधिक असते.
व्हिटॅमिन सीची कमतरता कशी टाळायची?
व्हिटॅमिन सी सहज उपलब्ध असणाऱ्या फळे आणि भाज्यांमध्ये आढळते. जर तुम्ही दररोज सुमारे 4 ग्रॅम व्हिटॅमिन सीचा समावेश आहारात केला, तर डोक्यामधील रक्त परिसंचरण सुधारेल ज्यामुळे केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ खाल्ल्यास केसांची गुणवत्ता सुधारते आणि अकाली पांढरे होण्यापासून बचाव होतो.
हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/health/disadvantages-of-strong-nose-blowing/868967
कोणते पदार्थ खावे?
व्हिटॅमिन सीसाठी फळांमध्ये संत्री, पेरू, द्राक्षे, ब्लॅकबेरी आणि पपई खाणे फायदेशीर ठरते. भाज्यांमध्ये ब्रोकोली, पालक, टोमॅटो आणि कोबी यांचा समावेश करावा. हे पदार्थ नियमित आहारात असतील तर केसांना पोषण मिळेल आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबेल.
तरुण वयात केस पांढरे होणे टाळण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली महत्त्वाची आहे. व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करा आणि तुमच्या केसांना योग्य पोषण द्या.