Health Tips : आठवड्यातून तीन वेळा पेरूची पाने का खाल्ली पाहिजे? याचे फायदे जाणून तुम्ही पण थक्क व्हाल

Health Tips : आपण पेरू तर आवडीने खातो पण तुम्हाला माहितीये पेरूची पानेदेखील आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 29, 2024, 10:30 AM IST
Health Tips : आठवड्यातून तीन वेळा पेरूची पाने का खाल्ली पाहिजे? याचे फायदे जाणून तुम्ही पण थक्क व्हाल title=

Health Tips : हिवाळी आला की बाजारात आपल्या अनेक फळं दिसतात. त्यातील एक फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं, ते म्हणजे पेरू. क्वचितच कोणी असेल ज्यांना पेरू आवडत नाही. खायला चविष्ट आणि गोड असणारे हे फळ आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. पेरूचं सेवन केल्यामुळे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोह मुबलक प्रमाणात आपल्याला मिळतात. खास करु हिवाळ्यात पेरूचं सेवन हे आपल्यासाठी आरोग्यासाठी वरदान ठरतं. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, पेरूच्या फळासोबत त्याचा पानाचाही आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. आठवड्यातून किमान तीन वेळा पेरूची पाने का चघळली पाहिजेत, असं आयुर्वैदात सांगण्यात आलंय. पण याचे काय फायदे आहेत, हे जाणून तुम्हीही पण आजपासून पेरूची पानं फेकणार नाहीत तर त्याचं सेवन कराल.  (Why should guava leaves be eating thrice a week benefits of guava leaves Health Tips in marathi)

पचन सुधारते

पचन किंवा आम्लपित्त सारखी समस्या असणाऱ्या लोकांनी पेरूची पाने चघळणे खूप फायदेशीर मानले जाते. पाने चघळल्याने बद्धकोष्ठतेचा धोका कमी होण्यास मदत मिळते. एवढंच नाही तर डायरियाच्या समस्येपासूनही तुमचे संरक्षण होतं. पेरूची पाने चघळल्यावर पोटात अडकलेला वायूही बाहेर पडण्यास मदत मिळते. 

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

आयुर्वेदानुसार पेरूची पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर मानली गेली आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही पेरूची पाने खायला पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात. ते चघळल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

पेरूची पाने किंवा पेरूच्या पानांचा चहा नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यास फायदेशीर ठरते. हे ब्राँकायटिस, दातदुखी, ऍलर्जी, जखमा, घसा खवखवणे आणि कमजोर दृष्टी इत्यादींवर उपचार करण्यात मदत करतात. जेव्हा तुम्ही पेरूची पाने चघळता तेव्हा ते तुमच्या शरीरातील हानिकारक पेशी आणि विषाणू काढून टाकण्यास मदत मिळते. 

वजन कमी करण्यास उपयुक्त

पेरूची पाने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला भूक कमी लागते आणि जास्त खाण्याच्या समस्येपासून तुमचा बचाव होता. ज्याचा परिणाम वजन कमी करण्यास फायदा मिळतो. शिवाय वाढलेले वजन कमी करायचे असेल तर पेरूच्या पानांचा चहा हा जरूर प्यायला पाहिजे. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)