महिलांना गर्भधारणेपासूनच अनेक प्रकारची खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. या काळात बाळाच्या शरीराचे अवयव तयार होत असतात, म्हणून गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, प्रसूतीनंतरही, महिलांना अनेक गोष्टी करण्यास मनाई आहे. जसे की, महिलांना प्रसूतीनंतर सुमारे 40 दिवस डोके आणि कान झाकण्याचा सल्ला दिला जातो. लोकांचा असा विश्वास आहे की, प्रसूतीनंतर, आईकडून बाळाला सर्दी होण्याचा धोका जास्त असतो, अशा परिस्थितीत, महिलेने तिचे डोके आणि कान झाकले पाहिजेत, कारण सर्दीची लक्षणे डोके आणि कानांपासून सुरू होऊ शकतात. पण आता प्रश्न असा पडतो की, उन्हाळ्यातही हे करणे योग्य आहे का? अपोलो हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भूमिका बन्सल यांनी याबाबत आपलं मत मांडल आहे.
प्रसूतीनंतर महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. खरंतर, या काळात महिलेचे शरीर प्रसूतीमुळे झालेल्या जखमांमधून बरे होत असते. अशा परिस्थितीत, बाह्य संसर्ग आणि फ्लू इत्यादी टाळण्यासाठी महिलांना डोके आणि कान झाकण्याचा सल्ला दिला जातो. त्याच वेळी, डॉक्टर म्हणतात की, प्रसूतीनंतर प्रत्येक महिलेचे डोके आणि कान झाकण्याबाबत वैद्यकीय शास्त्रात कोणतेही तथ्य नाही. हिवाळ्यात प्रसूतीनंतर महिलांना थंडीपासून वाचवण्यासाठी अशा प्रकारची सूचना दिली जाऊ शकते. पण, उन्हाळ्यात डोके झाकल्याने काही महिलांना समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, यामुळे महिलांना अस्वस्थ वाटू शकते. म्हणूनच, प्रसूतीनंतर महिलेच्या आरामावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. तसेच, उन्हाळ्याच्या काळात डोके आणि कान झाकल्याने महिलांना जास्त घाम येऊ शकतो. यामुळे त्यांच्यासाठीही समस्या निर्माण होऊ शकतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)