कोरोना संक्रमित असल्याची भीती, सर्वात आधी करा `ही` गोष्ट
कोरोनाचा धोका वाढतोय, लक्षणे आढळल्यास घ्या काळजी
मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा आपलं जाळ जगभरात पसरवायला सुरूवाच केली आहे. अशा स्थिती जर तुम्हाला कोरोनाची लक्षण आपल्या शरीरात असल्यासारखं वाटत असेल. किंवा तुम्हाला कोरोनाची लागण झाल्यासारखं वाटत असेल तर तात्काळ उपचार घ्या. त्या दिशेने पाऊलं उचला.
तात्काळ डॉक्टरकडे जा
सर्वप्रथम, जर तुम्हाला थोडीशीही शंका असेल की तुम्ही कोरोनाच्या विळख्यात आला आहात, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे. जेणेकरून या संसर्गाची वेळीच तपासणी करता येईल. कोरोनाची अचूक ओळख होण्यासाठी त्याची चाचणी होणे आवश्यक आहे. (कोरोना व्हॅक्सीनच्या सर्टिफिकेटवर आता पंतप्रधान मोदींचा फोटो नसणार, कारण अतिशय महत्वाचं)
स्वतःला करा आयसोलेट
दुसरीकडे, ताबडतोब स्वत: ला विलिगीकरणात ठेवा. कारण कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य विषाणू आहे. असे मानले जाते की जर बाधित व्यक्ती तोंडावर रुमाल अथवा मास्क न घालता शिंकत असेल तर त्याचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात आला असाल तर तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल.
कोरोनाबाधित असल्याची गोष्ट लपवू नका
जर तुम्हाला संसर्ग झाला असेल तर तुम्ही ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून अजिबात लपवू नये. कारण असे केल्याने तुमच्या संपर्कात आलेले लोकही अडचणीत येऊ शकतात. त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला द्या. बर्याच वेळा कोरोना संक्रमित व्यक्तीला ताप, खोकला, थकवा आणि घसा खवखवण्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत ही लक्षणे अनेक प्रकरणांमध्ये वाढतात. वेळीच काळजी घेऊन ही लक्षणे नियंत्रित करता येतात.
तब्बेतीची काळजी घ्या, करा आराम
जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल तर अशा परिस्थितीत अजिबात काम करू नका कारण अशा संसर्गामुळे तुमच्या शरीरात अशक्तपणा येईल, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी लागेल. तसेच अधिकाधिक हिरव्या भाज्यांचे सेवन करावे लागेल. हे तुमच्या शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करेल.
स्वतःला ठेवा हायड्रेटेड
जेव्हा तुम्हाला संसर्गाची लक्षणे जाणवतात तेव्हा तुम्हाला स्वतःला हायड्रेटेड ठेवावे लागेल. यामुळे तुमच्या शरीरात संतुलन राहते आणि तुमचे शरीर संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते. वेळोवेळी पाणी प्यायला ठेवा, ज्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहील. शक्य असल्यास, आपण आपल्या आहारात फळांचा ज्यूस देखील समाविष्ट करू शकता. म्हणजेच, कोरोनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.