बिजापूर : छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात तेलंगणाच्या ग्रेहाऊंडच्या जवानांनी केलेल्या कारवाईत दहा नक्षलवादी ठार झाले आहेत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु, या कारवाईत एका जवानालाही आपले प्राण गमवावे लागलेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये कमांडरचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.


गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तेलंगणातल्या ग्रेहाऊंडच्या जवानांनी आज पहाटेच शेजारच्या छत्तीसगड राज्यातल्या बिजापूर जिल्ह्यात मोठ्या कारवाईला सुरूवात केली.


यात दहा नक्षलवादी ठार करण्यात ग्रेहाऊंडच्या जवानांना यश आलं. मात्र या कारवाईत एका ज्युनिअर कमांडोला आपला जीव गमवावा लागला.