Viral Video : सोशल मीडियावर अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ महाराष्ट्रातील पुण्यातील असून एका चिमकुल्यावर पाचल्या मजल्यावरून कुंडी पडल्याने मृत्यू झाला अशा आशयाचा बातम्या व्हायरल होत आहे. पण आम्ही तुम्हाला या व्हिडीओमागील सत्य सांगणार आहोत. हा व्हिडीओ खरा असून एप्रिल महिन्याच्या 11 तारखेला ही धक्कादायक घटना घडली आहे.
मुलांच्या शाळेच्या परीक्षा संपल्या असून त्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. अशा स्थितीत मुलं घराबाहेर अंगणात किंवा बिल्डिंगमधील मुलं पार्किंग परिसरात खेळत असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा सुरत सुरतच्या सीमाडा परिसरात असलेल्या ब्लू सिटी अपार्टमेंटमधील आहे. इथे 12 वर्षीय सहावीत शिकणारा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत खेळत असताना त्याला मृत्यूने गाठवलं. याच बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावरून पीओपीचा एक तुकडा त्याच्या डोक्यावर पडला आणि तो क्षणातच खाली कोसळला. ही संपूर्ण घटना बिल्डिंगमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या दुर्घटनेत चिमुकल्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील लोकांनी आणि पालकांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केलं. पण 11 दिवस आयुष्याशी झुंज दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
सुरतमध्ये पार्किंगमध्ये खेळत असलेल्या मुलावर पाचवा मजल्यावरून पीओपीचा एक मोठा तुकडा कोसळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच सुरतमध्ये घडली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.#surat #marathinews #zee24taas pic.twitter.com/pBplztOo91
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 28, 2025
मिळालेल्या माहितीनुसार मूळचा अमरेलीतील सावरकुंडलामधील हे कुंटुंब सध्या भगवान नगरमधील ब्लूसिटी अपार्टमेंटमध्ये राहत होते. दुर्घटना झालेल्या मुलाचं नाव मंत्रा केतनभाई अकबरी असून तो इयत्या सहावीचा विद्यार्थी होता.केतनभाई अकबरी यांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने घरात शोककळा पसरली आहे.तो एक हुशार विद्यार्थी होता असं सांगितलं जातं.
या दुःखद घटनेचा पुढील तपास सरठाणा पोलीस करत असून या दुर्घटनेमुळे अपार्टमेंटच्या देखभालीबद्दल आणि इमारत व्यवस्थापनाच्या देखभालीबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित होतात.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता पुढील कारवाई करतील.