14 वर्षाच्या भाच्याने घेतला मामाचा बदला, त्याने केलं असं काही खतरनाक की...

फारुख तुरुंगात गेला. पण, फारुख तुरुंगात गेला याची जास्त रुखरुख त्याचा १४ वर्षाचा भाचा याला लागली. 

Updated: May 21, 2022, 02:20 PM IST
14 वर्षाच्या भाच्याने घेतला मामाचा बदला, त्याने केलं असं काही खतरनाक की... title=

उत्तर प्रदेश : ही घटना आहे कानपूरमधील... रेल्वे बाजार येथे राहणाऱ्या फिरोज रहात होता. त्याच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली. शेजारी राहणारा फारुख याच्यावर त्याचा संशय होता.

फिरोज याने केलेल्या तक्रारीवरून फारुख याला पोलिसांनी अटक केली. फारुख तुरुंगात गेला. पण, फारुख तुरुंगात गेला याची जास्त रुखरुख त्याचा 14 वर्षाचा भाचा याला लागली. त्याचे आपल्या मामावर खुप प्रेम होते. त्याने मनोमन आपल्या मामाचा बदला घेण्याचं ठरवलं.

दोन दिवसांपूर्वी फारुखच्या भाच्याने फिरोजच्या 11 वर्षाच्या मुलाला मैदानात खेळायला नेलं. मात्र, तो केवळ बहाणा होता. तिथे त्याने त्या मुलावर सॅनिटायझर टाकले आणि त्याला आग लावली.

तो ११ वर्षाचा मुलगा तिथेच तडफडत होता. काही जणांनी त्याला जळत असलेला पाहून तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्या ११ वर्षाच्या बाळास तसाच टाकून  आरोपी मुलगा घटनास्थळावरून पळून गेला.

कानपूर पूर्वचे डीसीपी प्रमोद कुमार यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, एका मुलाला सॅनिटायझरने जाळल्याचं प्रकरण समोर आलं. त्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असून त्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची त्यांनी सांगितलं.