24 तृतीयपंथीयांकडून सामूहिक आत्महत्या करण्याचं ठरलं; सगळ्यांनी फिनाईल प्यायलं अन्..; एकच खळबळ, प्रशासनही हादरलं

Indore Transgenders Mass Suicide: इंदूरमध्ये एकूण 24 तृतीयपंथीयांनी फिनाईल पित आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 16, 2025, 05:56 PM IST
24 तृतीयपंथीयांकडून सामूहिक आत्महत्या करण्याचं ठरलं; सगळ्यांनी फिनाईल प्यायलं अन्..; एकच खळबळ, प्रशासनही हादरलं

Indore Transgenders Mass Suicide: मध्य प्रदेशातील इंदूर येथे 24 तृतीयपंथीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार असल्याचा बनाव करत दोन तृतीयपंथीयांवर बलात्कार करण्यात आल्याच्या निषेधार्थ त्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या कऱण्याच्या हेतूने त्यांनी फिनाईल प्राशन केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 24 तृतीयपंथीयांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आणि फिनाइल प्यायलं. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस आणि वैद्यकीय पथकं घटनास्थळी दाखल झाली होती. 

Add Zee News as a Preferred Source

सर्व 24 तृतीयपंथीयांना तात्काळ महाराज यशवंतराव रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. "तृतीयपंथी समुदायातील लोकांना आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी बुधवारी रात्री एकत्र फिनाईल घेतल्याचा दावा केला आहे. त्यापैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही," असं एमवाय हॉस्पिटलचे प्रभारी अधीक्षक डॉ बसंत कुमार निंगवाल यांनी सांगितलं.

पोलिसांनी सांगितलं की, पंकज आणि अक्षय या दोघांनी आपण पत्रकार असल्याचं भासवून एका तृतीयपंथी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असून त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलं. तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेशी संपर्क साधला आणि तृतीयपंथी समाजातील वादाचे वार्तांकन करणारे पत्रकार असल्याचं सांगितलं. त्यांनी तिच्याकडून पैसे मागितले आणि माध्यमांमध्ये तिचं नाव बदनाम करण्याची धमकी दिली. तिने नकार दिल्यावर, त्यापैकी एकाने तिला जवळच्या इमारतीत ओढलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, "दोघांनीही पत्रकार म्हणून स्वत:ची ओळख करून दिली आणि पैसे मागितले. मी नकार दिल्यावर पंकज मला एका इमारतीत घेऊन गेला, मला धमकावलं आणि माझ्याशी गैरवर्तन केलं." तिने पुढे म्हटले की, आरोपींनी घटनेची माहिती दिल्यास खोटा खटला दाखल करून तिला तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली.

तिच्या तक्रारीनंतर पंढरीनाथ पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला. "आम्ही एफआयआर नोंदवला आहे आणि दोघांचा शोध सुरू केला आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल," असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

FAQ

1) इंदूर येथे काय घटना घडली?
मध्य प्रदेशातील इंदूर येथे सुमारे २४ तृतीयपंथीय व्यक्तींनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी फिनाइल प्राशन करून स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आणि पोलीस व वैद्यकीय पथकं घटनास्थळी दाखल झाली.

2) हा प्रयत्न कशामुळे केला गेला?
दोन व्यक्तींनी पत्रकार असल्याचा बनावट करून एका तृतीयपंथी महिलेवर बलात्कार केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. आरोपींनी पीडित महिलेला धमकावून पैसे मागितले आणि नकार मिळाल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तृतीयपंथी समुदायाने याला विरोध दर्शवण्यासाठी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला.

3) पीडित तृतीयपंथी महिलेच्या तक्रारीची माहिती काय?
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी पंकज आणि अक्षय यांनी पत्रकार असल्याचे सांगून तिच्याशी संपर्क साधला. त्यांनी तृतीयपंथी समाजातील वादाचे वार्तांकन करत असल्याचे भासवले आणि पैसे मागितले. नकार मिळाल्यावर पंकजने तिला जवळच्या इमारतीत ओढले, धमकावले आणि बलात्कार केला. आरोपींनी घटनेची माहिती दिल्यास खोटा खटला दाखल करून तिला तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More