Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीबद्दल काय होतं 5 एक्झिट पोलमागील सत्य? कोणाचं भाकीत ठरणार खरं?

Bihar Election 2025: निकालापूर्वी बहुतेक एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. कोणाचा पोल ठरणार खरा पाहूयात...

नेहा चौधरी | Updated: Nov 14, 2025, 12:46 PM IST
Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीबद्दल काय होतं 5 एक्झिट पोलमागील सत्य? कोणाचं भाकीत ठरणार खरं?

Bihar Election Exit Poll Result 2025 :  बिहारचा बहुबली कोण असणार हे आज स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत असून बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरतोय. पण निकाल लागण्यापूर्वी मंगळवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले. जवळजवळ सर्व एक्झिट पोल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी (एनडीए) आघाडीवर असल्याचे दाखवत आहेत. जर आपण सर्व एजन्सींच्या एक्झिट पोलवर नजर टाकली तर महाआघाडीबद्दल असा दावा केला जात आहे की त्यांना 100 पेक्षा कमी जागा मिळतील. पण, मोठा प्रश्न असा आहे की या आकडेवारीवर डोळे झाकून विश्वास ठेवता येईल का? गेल्या काही वर्षांच्या निवडणूक नोंदींवर नजर टाकली तर एक्झिट पोल अनेक वेळा चुकीचे सिद्ध झाल्याचे पाहिला मिळाले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

दिल्ली विधानसभा निवडणूक 2025

2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या त्यांच्या एक्झिट पोलमध्ये, MATRIZE आणि Chanakya Strategies या दोघांनीही जवळच्या लढतीचा अंदाज वर्तवला होता. MATRIZE ने भाजपला 35 ते 40 जागा आणि AAP ला 32 ते 37 जागा दाखवल्या होत्यात. तर Chanakya Strategies ने भाजपला आघाडीवर दाखवलं होतं. 39 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला होता. निकाल आले तेव्हा, एक्झिट पोल मोठ्या प्रमाणात अचूक ठरलं होतं. भाजपने 48 जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्ष 22 जागांवर घसरलयाचे पाहिला मिळाले. 

हरियाणा विधानसभा निवडणूक 2024

आता हरियाणातील एक्झिट पोलबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसला स्पष्ट आघाडी दर्शविण्यात आली होती. भास्कर रिपोर्टर्स पोलमध्ये काँग्रेसला 44 ते 54 आणि भाजपला 19 ते 29 जागा मिळतील असं वर्तविलं होतं, तर सीव्होटरने काँग्रेसला 50 ते 58 जागांसह मोठा विजय मिळेल असे भाकीत केलं होतं. पण, निकाल येताच भाजपने मैदान मारल्याचे चित्र दिसून आलं. प्रत्यक्ष निकालांमध्ये, भाजपने 48 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला फक्त 37 जागा मिळाल्या.


जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024

जम्मू आणि काश्मीरमधील एक्झिट पोलमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युतीला आघाडी मिळेल असं भाकीत केलं होतं. तर सीव्होटरने युतीला 40 ते 48 आणि भाजपला 27 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज दर्शविण्यात आला होता, तर भास्कर रिपोर्टर्स पोलमध्ये युतीला 35 ते 40 आणि भाजपला 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज दर्शविला होता. प्रत्यक्ष निकालही बऱ्याच प्रमाणात अचूक ठरला होता. एक्झिट पोलमध्ये युतीला 48 आणि भाजपला 29 जागा मिळणार असं दाखविण्यात आले होते. 

लोकसभा निवडणूक 2024

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये, बहुतेक एजन्सींनी एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली होती. मॅट्रिझने एनडीएला 353 ते 368 जागा आणि इंडिया अलायन्सला 118 ते 133 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता, तर सीव्होटरने एनडीएला 353 ते 383 आणि इंडिया अलायन्सला 152 ते 182 जागा मिळतील असं भाकीत वर्तविण्यात आला होता. पण, निकालांमध्ये एनडीएला 292 जागा मिळाल्या, जे अपेक्षेपेक्षा कमी होते आणि इंडिया अलायन्सने अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी करत 234 जागा जिंकल्या होत्या. 

झारखंड विधानसभा निवडणूक 2024

झारखंडमध्ये एनडीएला आघाडी मिळेल असं एक्झिट पोलमध्ये भाकीत केलं होतं. मॅट्रिझने एनडीएला 42 ते 47 आणि इंडिया अलायन्सला 25 ते 30 जागा मिळेल असं सांगण्यात आलं होतं, तर चाणक्य स्ट्रॅटेजीजने एनडीएला 45 ते 50 आणि इंडियाला 35 ते 38 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलं होतं. पण, निकाल उलटे गेल्याचा पाहिला मिळाला होता. एनडीएला फक्त 24 जागा मिळाल्या, तर इंडिया अलायन्सने 56 जागा जिंकून शानदार कामगिरी केल्याच पाहिला मिळालं. 


एक्झिट पोलची वास्तविकता

गेल्या अनेक निवडणुकांमधील एक्झिट पोलने जनतेचा पक्षपातीपणाचा अंदाज लावण्यास मदत करताना पाहिला मिळाला होता. पण प्रत्यक्ष निकाल अनेकदा वेगळे लागल्याचे पाहिला मिळाले आहे. दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसारख्या राज्यांमध्ये, एक्झिट पोलने काही प्रमाणात अचूक ट्रेंड दाखवले आहेत, तर झारखंड, हरियाणा आणि लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष निकाल अंदाजांपेक्षा खूपच वेगळे लागले होते. यावरून स्पष्ट होते की एक्झिट पोल हे फक्त एक भाकीत आहे. प्रत्यक्ष निवडणूक निकाल जनतेच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहते, हे मात्र सत्य आहे. 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More