अंगठीत 6 हजारहून अधिक हिरे, इतकी आहे किंमत

हिऱ्यांची अंगठी चर्चेत

Updated: Jun 16, 2018, 05:27 PM IST
अंगठीत 6 हजारहून अधिक हिरे, इतकी आहे किंमत

मुंबई : जर तुम्हाला सांगितलं की एका अंगठीमध्ये 6690 हिरे आहेत तर तुम्हा यावर विश्वास कराल का? पण ही गोष्ट खरी आहे. हिरा नगरी सूरतमध्ये या अंगठीचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आलं आहे. एका हिरा व्यापारी 6690 हिरे असलेली अंगठी बनवली आहे. ज्याची किंमत 24 कोटी आहे. 

सूरतचे हिरा व्यापारी विशाल अग्रवाल यांच्या नुसार मेक इन इंडियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आहे. याची डिझाईन विशाल यांची पत्नी खुशबु अग्रवाल यांनी केली आहे. ही लोटस अंगठी तयार करण्यासाठी 20 कारागीर लागले होते.

हिऱ्याची अंगठी बनवण्यासाठी आधी कमळाच्या फुलाची डिझाईन कंम्यूटरमध्ये बनवण्यात आली. यानंतर त्याचं कॉन्सेप्टयुलाइजेशन करण्यात आलं. फायनल डिझाईन तयार करण्याची प्रक्रिया यानंतर सुरु झाली. एका वर्षात ही अंगठी बनून तयार झाली. 18 कॅरेट रोज गोल्ड आणि 24 टक्के अलॉय पासून ही अंगठी बनवली आहे. 58.176 ग्रॅम वजनाची ही अंगठी आहे.