7 वा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाची केली होती मागणी
मुंबई : लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाची केली होती मागणी
अनेक सरकारी कर्मचारी सातवा वेतन आयोगाची वाट पाहत होते. सरकार या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मोठी खुशखबरी देणार आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी आणि फिटमेंट फॅक्टरीत वाढ करण्यात आली आहे.
अरूण जेटली यांनी दोन वर्षापूर्वी राज्यसभेत वेतन वाढवण्याचे आश्वासन दिले होते. यासोबतच 6 जुलै 2017 मध्ये केंद्र सरकारने 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाची सिफारस देखील केली होती. सातवा वेतन आयोगात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे.
कमीत कमी एवढे हजार रूपये वाढणार पगार
मॅट्रिक्स स्तरानुसार 1 ते 5 व्या वेतन प्राप्त कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत वाढ केली जाणार आहे. या न्यूनतम सॅलरीनुसार वेतन 18 हजार रुपयावरून 21 हजार रुपये वाढ होऊ शकते. तर फिटमॅट फॅक्टरला देखील 2.57 टक्के वाढून 3 टक्के गेलं आहे. कर्मचाऱ्यांना याचा फायदा एप्रिल 2018 मध्ये मिळमार आहे. हा पगार 18 हजार रुपयांपासून 26 हजार रुपयांपर्यंत होणार आहे.