भारताच्या ऑटो सेक्टरमध्ये मोठी क्रांती होणार आहे. पेट्रोलमध्ये 85 टक्के 'अल्कोहोल' मिसळले जाणार आहे. E85 इंधनाचा जबरदस्त पर्याय लवकरच प्रत्यक्षात अमंलात आणला जाणार आहे.

Vehicle Will Run With Alchohol In India : भारताच्या ऑटो सेक्टरमध्ये मोठी क्रांती होणार आहे. भारत सरकार लवकरच E85 इंधनाचा जबरदस्त पर्याय आणणार आहे. पट्रोलमध्ये 85 टक्के 'अल्कोहोल' अर्थात इथेनॉल मिसळले जाणार आहे. सरकार 85 टक्के इथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोल यांचे मिश्रण असलेले E85 प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत आहे. सरकार लवकरच यासाठी मसुदा नियम अधिसूचित करणार आहे. युद्धामुळे जगात भीषण इंधन टंचाई अससताना भारत सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारताचे तेलाच्या गरजांसाठी परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
85 टक्के इथेनॉल असलेल्या E85 इंधनावर सरकार नियम लागू करू शकते. यामुळे तेलाची आयात कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल, परंतु त्यासाठी विशेष इंजिन आणि नवीन वैशिष्ट्यांची गरद आहे. कारण, हे हे इंधन पारंपरिक वाहनांमध्ये वापरता येणार नाही. यामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये त्या अनुषंगाने महत्वपूर्ण बदल करावा लागणार आहे.
E85 हे एक इंधन आहे, ज्यामध्ये 85 टक्के इथेनॉल आणि 15 टक्के गॅसोलीन असते. हे पारंपरिक गॅसोलीनपेक्षा वेगळे आहे, कारण त्यात प्रामुख्याने जैवइंधन असते. यामुळे ऊर्जेचा एक नवीन पर्याय निर्माण होतो, जो पर्यावरणासाठी अधिक चांगला मानला जातो.
E85 मध्ये वापरले जाणारे इथेनॉल ऊस, मका आणि इतर धान्यांपासून तयार केले जाते. याचा अर्थ आता शेतकऱ्यांच्या पिकांचे थेट इंधनात रूपांतर केले जाणार आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची संधी निर्माण होते. भारताने यापूर्वीच E20, म्हणजेच 20% इथेनॉल असलेले पेट्रोल लागू केले आहे, परंतु E85 हा एक खूप मोठा बदल आहे कारण त्यात पेट्रोलऐवजी प्रामुख्याने इथेनॉल असेल, ज्यामुळे तेलावरील अवलंबित्व वेगाने कमी होऊ शकते.
E85 चा वापर फक्त फ्लेक्स-फ्यूएल वाहनांमध्ये (FFVs) केला जाणार आहे. सामान्य पेट्रोल इंजिन हे इंधन वापरता येणार नाही. कारण यामुळे इंजिनचे नुकसान होऊ शकते, म्हणून नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 90 टक्के तेल आयात करतो. E85 च्या वापरामुळे हे अवलंबित्व कमी होऊ होणार आहे. ज्यामुळे देशाला आर्थिक आणि सामरिक दोन्ही फायदे मिळणार आहेत
इथेनॉल ग्रीन एनर्जींचा सर्वोत्तम पर्याय आहे. इथेनॉल पेट्रोलपेक्षा अधिक स्वच्छपणे जळते, त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. E85 इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण कमी होण्यास आणि पर्यावरण संवर्धनास मदत होणार आहे. पेट्रोल पंपांवर E85 साठी स्वतंत्र साठवणूक आणि नोझल प्रणालीची आवश्यकता असेल. हे नवीन इंधन देशभरात सहज उपलब्ध करून देण्यासाठी तेल कंपन्यांना मोठी गुंतवणूक करावी लागेल. E85 चा अवलंब करण्यासाठी अनेक बदल करावे लागणार आहेत. नवीन वाहनांची गरज, नवीन इंजिन प्रणाली. चुकीच्या वाहनात E85 वापरल्याने हानी होऊ शकते, त्यामुळे जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, E85 चा वापर देशात मोठी क्रांती घडवणार आहे.