)
केरळच्या तिरुवनंतपुरम परिसरात थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. जेवणादरम्यान घशात अन्न अडकल्यामुळे 18 महिन्यांच्या अर्शीदचा मृत्यू झाला. मात्र तपासादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्शीदवर अनेक दिवसांपासून अत्याचार सुरु होते. त्याला शारीरिक त्रास दिला जात होती. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्या हत्येचा कट रचला जात होता. पोलिसांत समोर आलं आहे की, 18 महिन्यांच्या अर्शीदला तिच्या सावत्र बापाने भींतीवर आपटून मारल्याचा प्रकार घडला आहे. तर आईने नुसती बघ्याची भूमिका घेतली आहे.
ही घटना आहे राजधानी तिरुवनंतपुरमपासून 20 किमी अंतरावर असलेल्या नेदुमंगडच्या पानावूर परिसरात ही घटना 29 मे रोजी घडली आहे. संध्याकाळी अर्शीदला पानावूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून अर्शीदला श्री अविट्टम थिरुनाळ रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आलं. जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आलं.
अर्शीदच्या सावत्र बापाने रुग्णालयातील बापाला सांगितलं की, ते त्यांच्या मुलाला जेवण भरवत होते तेव्हा त्याचा जीव गुदमरला आणि तो बेशुद्ध पडला. मात्र जवळच्या व्यक्तींनी खास करुन अर्शीदच्या आजींकडून या वाक्याच खंडन केलं आणि पोलिसांनी देखील यावर शंका व्यक्त केली आहे.
पोस्टमार्टममध्ये समोर आलेलं सत्य हे भयावह होतं. अर्शीदच्या मृत्यूचं कारण हे सतत मारहाण, अंतर्गत रक्तस्त्राव आणि त्याच्या संपूर्ण अंगावर सिगरेटच्या चटके असल्यामुळे झाला आहे. अर्शीदच्या जांगांवर खोलवर जखमा होत्या. तसेच सिगरेटचे व्रण देखील असतात. शरीरावर जवळपास 51 जखमा असल्याच समोर आलं आहे. 30 मे रोजी रात्री अर्शीदची 21 वर्षीय आई अखिला आणि तिच्या लिव इन पार्टनरला अटक करण्यात आली आहे.
सोमवारी पोलिसांनी पुरावे जमा करण्यासाठी अश्करच्या घरी गेले असता त्यांना अर्शीदला मारण्यासाठी वापरलेली काठी आणि चटके देण्यासाठी वापरलेलं लायटर मिळालं आहे. अश्करने पोलिसांना सांगितलं की, तीन महिन्यांपूर्वीच अर्शीदला मारण्याचा प्लान केला होता. गेल्या एक महिन्यांपासून अर्शीदला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याच समोर आलं आहे.
पुढे चौकशीत तो म्हणाला की, अर्शीदमुळे अखिलाच्या आयुष्यात येण्यात अडथळा निर्माण केला आहे. 29 मे रोजी जेव्हा अर्शीद रडला तेव्हा त्याला भींतीवर आपटण्याच आलं. या घटनेत त्याचा मृत्यू झाला त्यानंतर घरात साफसफाई करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं. आरोपीने कबुल केलेल्या गुन्ह्यात सांगितलं आहे की, मृत्यू होण्यापूर्वी अर्शीदला जेव्हा तो मारहाण करायचा तेव्हा तो नियमितपणे त्याच्या तोंडात कापडाचा बोळा भरायचा. ज्यामुळे त्याचा आवाज कधीच घराबाहेर आला नाही.