मध्यरात्री उद्योजकाच्या हत्येने शहर हादरलं! 6 वर्षांपूर्वी मुलाची सेम-टू-सेम झाली होत्या हत्या

मगध हॉस्पिटलचे मालक गोपाळ खेमका त्यांच्या कारमधून उतरत असताना, गांधी मैदान परिसरातील त्यांच्या निवासस्थानाजवळील पनाशे हॉटेलजवळील एका अपार्टमेंटजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.  

शिवराज यादव | Updated: Jul 5, 2025, 09:45 AM IST
मध्यरात्री उद्योजकाच्या हत्येने शहर हादरलं! 6 वर्षांपूर्वी मुलाची सेम-टू-सेम झाली होत्या हत्या

बिहारच्या पाटण्यात प्रसिद्ध उद्योजक गोपाल खेमका यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी गोपाल खेमका यांना गोळ्या घालून ठार केलं. महत्त्वाची बाब म्हणजे, सहा वर्षांपूर्वी गोपाल खेमका यांचा मुलगा गुंजन खेमकाची अगदी याच प्रकारे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 

Add Zee News as a Preferred Source

अज्ञात हल्लेखोरांनी खेमका यांच्यावर गोळीबार केला. खेमका हे राज्यातील सर्वात जुन्या खासगी रुग्णालयांपैकी एक असणाऱ्या मगध रुग्णालयाचे ते मालक होते. गांधी मैदान परिसरातील त्यांच्या निवासस्थानाजवळील पनाशे हॉटेलजवळील एका अपार्टमेंटजवळ, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

हत्येनंतर खेमका यांचा भाऊ शंकर यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गोळीबारानंतर जवळजवळ तीन तासांनी अधिकारी घटनास्थळी पोहोचले असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल खेमका बांकीपूर क्लबचे संचालकदेखील होते. ते घरी परतत असताना रात्री 11.40 च्या सुमारास गाडीतून बाहेर पडताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. शंकर यांनी दावा केला आहे की, पहाटे 2.30 च्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते.

विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यानंवर शिल्लक असताना या घटनेनंतर राजकीय वातावरणही पेटलं आहे. खासदार पप्पू यादव यांनी नितीश कुमार यांच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबाचं सांत्वनही केलं. 

पाटण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी दीक्षा कुमारी म्हणाल्या की, सर्व बाजूंनी तपास केला जात आहे आणि तपासासाठी महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. "४ जुलै रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास, आम्हाला माहिती मिळाली की गांधी मैदानाच्या दक्षिण भागात व्यापारी गोपाळ खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गुन्ह्याचे ठिकाण सील करण्यात आलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे. एक गोळी आणि एक काडतूस जप्त करण्यात आलं आहे," कुमारी म्हणाल्या.

2018 मध्ये खेमका यांच्या 38 वर्षीय मुलाचीही अगदी अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. पटणाच्या बाहेरील वैशाली येथील त्यांच्या कापूस कारखान्यासमोर कारमधून उतरत जात असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. 

 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More