बंगळुरुत एका डॉक्टरला पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही तर त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर चार ते पाच महिलांना मेसेज पाठवला होता. हत्या केल्यानंतर काही आठवड्यांनी त्याने हा मेसेज पाठवला होता. यामध्ये त्याने 'मी तुझ्यासाठी पत्नीची हत्या केली आहे,' असं लिहिलं होतं. आरोपी, डॉ. महेंद्र रेड्डी जी.एस हा एक जनरल सर्जन आहे. त्याची पत्नी डॉ. कृतिका एम. रेड्डी त्वचारोगतज्ज्ञ होती. त्याने भूल देणारे औषध देऊन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. ऑक्टोबरमध्ये आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रने फोनपे या पेमेंट अॅपच्या माध्यमातून हे मेसेज पाठवले होते. ज्यामध्ये ट्रान्झॅक्शन नोट्स सेक्शनचा वापर करून संपर्क साधण्यात आला होता. मेसेज मिळालेल्या महिलांमध्ये एक डॉक्टरही आहे. तिने महेंद्रचा प्रस्ताव नाकारला होता. पोलिसांनी जप्त केलेल्या फोन आणि लॅपटॉपमधून डेटा मिळवल्यानंतर हे संदेश पाठवल्याचं उघड झालं आहे. हा सर्व डेटा विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मध्ये पाठवण्यात आला आहे.
तपासकर्त्यांच्या माहितीनुसार, महेंद्रने त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर जुने नातेसंबंध पुन्हा नव्याने सुरु करण्याचा प्रयत्न केला.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला महेंद्रला त्याची पत्नी कृतिका हिला प्रोपोफोल हे भूल देणारे औषध देऊन खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दोघेही व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये काम करत होते. 26 मे 2004 रोजी त्यांचं लग्न झालं होतं. 23 एप्रिल 2025 रोजी, कृतिका तिच्या वडिलांच्या घरी मराठहल्ली येथे बेशुद्ध होऊन खाली कोसळली होती. आरोग्यासंबंधित समस्यांमुळे ती तिथे राहत होती.
महेंद्रने तिची भेट घेतली आणि दोन दिवस तिला इंट्राव्हेनस इंजेक्शन दिले. तो तिच्यावरील उपचाराचा भाग आहे असा दावा करत त्याने ही इंजेक्शन्स दिली होती. जवळच्या खाजगी रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आलं होतं.
मृत्यू नैसर्गिक वाटत असल्याने पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा रिपोर्ट दाखल केला होता. पण कृतिकाची बहीण डॉ. निकिता एम रेड्डीने संशय व्यक्त केला आणि सविस्तर चौकशीची मागणी केली. सहा महिन्यांनंतर, एफएसएल अहवालात अनेक अवयवांमध्ये प्रोपोफोलची उपस्थिती असल्याची पुष्टी झाली, ज्यामुळे कृतिकाला भूल देण्याचे औषध देण्यात आले होते हे सिद्ध झाले.
त्यानंतर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 103 अंतर्गत हा खटला पुन्हा खून म्हणून वर्गीकृत करण्यात आला. यानंतर महेंद्रला उडुपीतील मणिपाल येथून अटक करण्यात आली. हत्येनंतर तो तिथे स्थलांतरित झाला होता.
महेंद्रच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही पोलिसांनी उघड केलं आहे. त्याचा जुळा भाऊ डॉ. नागेंद्र रेड्डी जीएस, 2018 मध्ये अनेक फसवणूक आणि गुन्हेगारी खटल्यांना सामोरे गेला होता, तर महेंद्र आणि दुसरा भाऊ राघव रेड्डी जीएस, याला 2023 च्या धमकी प्रकरणात सह-आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. कृतिकाच्या कुटुंबाने दावा केला की लग्नाच्या वेळी ही माहिती लपवण्यात आली होती.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.