मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका पाच वर्षाच्या मुलाच्या आईचं अविवाहित आणि ब्राह्मण समाजाची असल्याचं सांगत एका हिंदू तरुणाशी लग्न लावण्यात आलं. मुलगी जेव्हा घरी आली तेव्हा तिच्या तोंडातून 'या अल्लाह', 'अल्लाह की कसम' सारखे शब्द ऐकल्यानंतर कुटुंबीयांना संशय आला. चौकशी केली असता नवरीमुलगी मुस्लिम असल्याचं उघड झालं. यानंतर नवरीमुलगी घरातून अडीच ते तीन लाख रुपये घेऊन फरार झाली. पीडित कुटुंबाने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीडित कुटुंबाने परशुराम सेनेच्या मदतीने आयुक्तांकडेही तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदौरच्या गांधीनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील हिंगोनिया खुर्द गावात वास्तव्यास असणाऱ्या तरुणाचे कुटुंबीय लग्नासाठी मुलीच्या शोधात होते. यादरम्यान तरुणाच्या भावाची भेट एका मुकेश मराठा नावाच्या व्यक्तीशी झाली. त्याने लग्नासाठी 20 हजार रुपये घेतले आणि आष्टा येथे राहणाऱ्या तरुणीबद्दल सांगितलं आणि त्यांची भेट घडवून दिली.
यानंतर, त्यांच्या लग्नाची तारीख 26 फेब्रुवारी 2024निश्चित करण्यात आली. तरुणाच्या कुटुंबाने लग्नाची सर्व तयारी केली होती, परंतु वधूचा इंदूरला येताना अपघात झाला असे सांगून लग्न रद्द करण्यात आले. त्यानंतर मुकेशने कोमल पठाण आणि नेहा नावाच्या दोन मुलींमध्ये भेट घडवून आणली. कोमलने अडीच लाख रुपये घेतले आणि एका मुलीची ओळख कुटुंबाशी करून दिली, ती ब्राह्मण समाजाची आहे आणि अविवाहित आहे असे सांगितले. मुलीचे नाव निकिता असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर 26 फेब्रुवारी रोजी त्या तरुणाचे निकितासोबत लग्न झाले. लग्नाच्या काही दिवसांनी निकिता तिच्या दैनंदिन संभाषणात 'या अल्लाह' आणि 'अल्लाह कसम' असे शब्द वापरत असल्याने कुटुंबाला संशय आला. तिची चौकशी केली असता निकिताने तिचं नाव नाजिया असं सांगितलं.
पीडित तरुणाने सांगितलं की, काही दिवसांनी कोमल पठाण आली आणि नाजियाला आमिष दाखवून सोबत घेऊन गेली. तीन दिवसांनी नाजिया परत आली आणि म्हणाली की कोमल पठाण तिला लग्नासाठी दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेली होती, परंतु तिने नकार दिला आणि ती परत आली. यानंतर, एके दिवशी जसवंतला शाहनवाज उर्फ शानू नावाच्या व्यक्तीचा फोन आला, त्याने सांगितले की तो नाजियाचा पती आहे आणि त्यांना एक 5 वर्षांचा मुलगा देखील आहे. हे ऐकून कुटुंब स्तब्ध झालं.
यानंतर, नाजिया अचानक घरातून सर्व सामान घेऊन पळून गेली. जेव्हा त्या तरुणाला नाजियाच्या कुटुंबाची माहिती मिळाली तेव्हा त्याला कळले की ती नैता मुंडला येथे भाड्याच्या घरात राहू लागली आहे. नाजियाचे मूल त्याच्याकडे आहे. जेव्हा तरुणाने नाझियाच्या आईशी बोलले तेव्हा तिनेही त्याला तिला विसरून जाण्यास सांगून धमकावण्यास सुरुवात केली. तरुणाच्या कुटुंबाने या प्रकरणाची माहिती परशुराम सेनेच्या अधिकाऱ्यांना दिली.
गांधीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली. पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यानंतर तरुण परशुराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयात पोहोचला. तरुणाच्या तक्रारीच्या आधारे तपास केला जात आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
CSK
(20 ov) 212/2
|
VS |
DC
189(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Delhi Capitals by 23 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 219/6
|
VS |
PBKS
223/4(18.5 ov)
|
| Punjab Kings beat Sunrisers Hyderabad by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 201/8
|
VS |
RR
202/4(18 ov)
|
| Rajasthan Royals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.