)
Hyderabad Bangalore Bus Accident: आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एका व्हॉल्वो बसला दुचाकीला धडक दिल्यानंतर भीषण आग लागली. हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या बसमध्ये एकूण 40 जण होते. दुर्घटना इतकी मोठी होती की, काही मिनिटातच बस आगीत जळून खाक झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, जिथे त्यांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मागून येणाऱ्या दुचाकीने बसला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला. दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली, ज्यामुळे आग लागली आणि संपूर्ण बस आगीने वेढली.
A Kaveri Travels bus from Hyderabad to Bengaluru caught fire near Kurnool early Friday, killing at least 25 passengers. 12 others escaped with injuries. Police suspect the blaze began after a bike hit the bus’s fuel tank. #Kurnool #BusFire #AndhraPradesh pic.twitter.com/KTwEVZmQY4
— Hyderabad Mail (@Hyderabad_Mail) October 24, 2025
"दुपारी 3 वाजताच्या सुमारास कावेरी ट्रॅव्हल्सची व्हॉल्वो बस हैदराबादहून बंगळुरूला जात होती. ती एका दुचाकीला धडकली. धडकेनंतर दुचाकी बसखाली अडकली. त्यामुळे कदाचित ठिणगी पडली आणि आग लागली," असं कुरनूलचे पोलिस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितलं आहे. "ही एसी बस असल्याने प्रवाशांना खिडक्या फोडाव्या लागल्या. जो कोणी काच फोडू शकले ते सुरक्षित आहेत," असंही त्यांनी सांगितलं.
I am shocked to learn about the devastating bus fire accident near Chinna Tekur village in Kurnool district. My heartfelt condolences go out to the families of those who have lost their loved ones. Government authorities will extend all possible support to the injured and…
— N Chandrababu Naidu (@ncbn) October 24, 2025
प्रवाशांच्या यादीनुसार, दोन चालकांसह 40 जण बसमध्ये होते. "15 जणांना वाचवण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग आटोक्यात आली आहे," असं विक्रांत पाटील यांनी सांगितलं आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला असून, सरकारी मदतीचं आश्वासन दिलं आहे. "कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेमुळे मला धक्का बसला आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. सरकारी अधिकारी जखमी आणि प्रभावित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करतील," अशी माहिती त्यांनी एक्सवरुन दिली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी अध्यक्ष वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या दुःखद दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे, ज्यामध्ये अनेक प्रवासी होरपळले. रेड्डी म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे आणि त्यामुळे त्यांना खूप धक्का बसला आहे. त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त केल्या आहेत.
FAQ
1) हा अपघात कधी आणि कुठे झाला?
अपघात २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ३:३० ते ५ वाजण्याच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील चिन्नाटेकूर गावाजवळ (कल्लूर मंडळ, एनएच४४ महामार्गावर) घडला. हा हायदराबाद-बंगळुरू महामार्गावर आहे.
2) बस मध्ये किती लोक होते?
बस मध्ये सुमारे ४० ते ४४ लोक होते, ज्यात ३८ ते ४० प्रवासी आणि २ चालकांचा समावेश होता.
3) अपघात आणि आगीचे कारण काय होते?
बसने रस्त्यावरील दुचाकी वाहनाला धडक दिली, ज्यामुळे धडकेने आग लागली. आगीने बस वेगाने पसरली आणि प्रवासी अडकले. नेमके कारण तपासात येले.