'मला मुलींचा आकडा आठवत नाही', 17 वर्ष शिक्षक करत होता विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, तब्बल 59....; पोलीसही हादरले

आरोप झाल्यापासून हाथरसमधील सेठ फूलचंद बागला पीजी कॉलेजचा मुख्य प्रॉक्टर रजनीश कुमार फरार होता.   

शिवराज यादव | Updated: Mar 20, 2025, 08:25 PM IST
'मला मुलींचा आकडा आठवत नाही', 17 वर्ष शिक्षक करत होता विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, तब्बल 59....; पोलीसही हादरले

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील पोलिसांनी 50 वर्षीय भूगोल प्राध्यापकाला विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याने आपल्या या कृत्यांचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं होतं. आपल्याजवळ असणाऱ्या तब्बल 59 व्हिडिओंचा वापर करून त्याने पीडित विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करत तोंड बंद केलं. तसंच त्यांना लैंगिक सुख देण्यास भाग पाडलं.

या आठवड्याच्या सुरुवातीला आरोप झाल्यापासून हाथरस येथील सेठ फूलचंद बागला पीजी कॉलेजचा मुख्य प्रॉक्टर रजनीश कुमार फरार होता. विद्यार्थिनींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराचे भयानक व्हिडिओ यूएसबी फ्लॅश किंवा पेन ड्राइव्हवर पोलिसांसोबत शेअर करण्यात आले होते. दरम्यान आरोपी रजनीश कुमारने आपण नेमक्या किती मुलींचं लैगिक शोषण केलं हे आठवत नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. 

आपण मागील काही वर्षांपासून पीडितांसोबतचं कृत्य रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली असा त्याचा दावा आहे. एका वेब कॅमेऱ्याने अनवधानाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे रेकॉर्डिंग केलं होतं. यावरुन त्याने अनेक तरुणींवर बलात्कार केला असावा असं दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क देण्यासाठी आणि नोकरी शोधण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून लाचही घेतली. याच्याही माध्यमातून त्याने लैंगिक सुविधा मागितल्या होत्या. 

प्रोफेसरला रेकॉर्डिंग करण्याची कल्पना कुठून सुचली?

रजनीश कुमारने पोलिसांना सांगितलं की, 2009 मध्ये तो एका विद्यार्थिनीसह नात्यात होतं. या नात्याला दोन्ही बाजूंनी संमती होती. एकदा ते सेक्स करत असताना कॉम्प्यूटरमधील वेबकॅममध्ये चुकून रेकॉर्ड झालं. यानंतर त्याला बलात्कार करताना व्हिडीओ रेकॉर्ड करत त्या माध्यमातून ब्लॅकमेल कऱण्याची कल्पना सुचली. 

हाथरसचे पोलिस अधीक्षक चिरंजीव नाथ सिन्हा यांच्या माहितीनुसार, त्यानंतर कुमारने त्याच्या कॉम्प्यूटकवर बलात्कारांचे रेकॉर्डिंग करण्यासाठी एक विशेष सॉफ्टवेअर बसवून घेतलं.

रजनीश कुमार कोण आहे?

पोलिसांनी सांगितलं की, कुमारचं 1996 मध्ये लग्न झालं होतं. त्या लग्नाची स्थिती अस्पष्ट आहे. तथापि, या जोडप्याला मुलं नव्हती.

2007 मध्ये त्याची बागला कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. गेल्या वर्षी त्याला मुख्य प्रॉक्टर म्हणून बढती देण्यात आली.

2008 मध्ये त्याची दहशत आणि लैंगिक शोषणाची सुरुवात झाली. आता त्याच्या मोबाईलमधून 65 हून अधिक व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत, त्यात काही पोर्नोग्राफिक वेबसाइटवर अपलोड केलेले व्हिडिओ देखील समाविष्ट आहेत.