महिलेच्या अंगावर एकही कपडा नाही अन् पुरुष...; मार्केटमधील धक्कादायक VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जखमी महिला मार्केटमध्ये मदतीसाठी हात पुढे करताना दिसत आहे  

शिवराज यादव | Updated: Oct 9, 2025, 04:11 PM IST
महिलेच्या अंगावर एकही कपडा नाही अन् पुरुष...; मार्केटमधील धक्कादायक VIDEO व्हायरल

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील मेस्ट रोड येथे बुधवारी रस्त्याच्या शेजारी उभया दोन स्कुटींमध्ये अचानक मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 8 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. कानपूरचे पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांनी सांगितलं आहे की, अवैध प्रकारे ठेवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे हा स्फोट झाला. या घटनेचा तपास करण्यात आला असता, बेकायदेशीरपणे साठवण्यात आलेले फटाकेच कारणीभूत असल्याचं उघड झालं. याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, इतरांचीही चौकशी सुरु आहे. 

Add Zee News as a Preferred Source

यादरम्यान या घटनेशी संबंधित एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत आगीत जळालेली महिला लोकांची मदत मागताना दिसत आहे. जळालेल्या अवस्थेत असणारी महिला दुकानदारांकडे मदतीसाठी आर्त विणवणी करत होती, मात्र सुरुवातीला कोणीही तिला मदत करत नाही. काही पुरुष तिच्यासमोर चालत निघून जातात मात्र मदतीसाठी पुढाकार घेत नाहीत. 

महिला दोन्ही हात पसरुन मदत मागताना दिसत आहेत. यावेळी ती अखेर खाली जमिनीवर पडताना दिसत आहे. तिच्या अंगावर जवळपास नाही म्हणावेत इतके कपडे आहेत.

आधी दुकानदार महिलेला पाहून घाबरतात आणि मागे हटतात. यानंतर त्यांच्यातील एकजण महिलेच्या अंगावर चादर टाकतो. ज्यानंतर 2 ते 3 दुकानदार तिला उचलून बहुतेक रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये महिलेची स्थिती अत्यंत भयानक आणि दयनीय दिसत आहे. यामध्ये स्फोट किती भयानक होता हे महिलेकडे पाहून दिसत आहे. 

या दुर्दैवी घटनेबद्दल बोलायचं गेल्यास चार गंभीर जखमी झालेल्यांना लखनऊत रेफर करण्यात आलं आहे. तर दोन लोक किरकोळ जखमी आहेत. उपचारानंतर त्यांना सोडण्यात आलं. इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस आता बेकायदेशीर फटाक्यांसंदर्भात मोहीम सुरु कऱणार आहे. 
 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More