महिला बँकेत पोहोचली, नाव आणि लॉकर क्रमांक सांगितला आणि हे ऐकताच मॅनेजरला फुटला घाम; कारण...

 Panjab National Bank: एक महिला तिच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे बँकेत ठेवलेले दागिने घेण्यासाठी आपल्या बहिणीसोबत गेली. पण पुढे जे झालं ते जाणून तुम्हाला धक्का बसेल.   

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 5, 2025, 01:44 PM IST
महिला बँकेत पोहोचली, नाव आणि लॉकर क्रमांक सांगितला आणि हे ऐकताच मॅनेजरला फुटला घाम; कारण...
Bank Scam

 Locker Scam: एक महिला तिच्या बहिणीसोबत हरियाणातील कर्नाल  येथील पंजाब नॅशनल बँकेत जाते. तिथं ती तिचं नाव मॅनेजरला सांगते आणि म्हणते, माझं लॉकर इथे आहे. पण ते ऐकून मॅनेजरला काय बोलावे हे समजत नाही. त्याचं झालं असं की, ज्या लॉकरबद्दल महिला विचारते त्या  बँकेच्या लॉकरमधून अनेक तोळे सोने गायब झाले आहे. हे सोने आणि लॉकर कोणाकडे आहे, हे कोणाला माहीतच नाहीये. हरियाणातील कर्नालच्या पंजाब नॅशनल बँकेतील हे धक्कादायक प्रकरण आहे. तिचे सोने कोणाकडे आहे? असा प्रश्न पीडित महिलेने केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नक्की काय आहे प्रकरण? 

हरियाणातील कर्नालच्या पंजाब नॅशनल बँकेतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बँकेच्या लॉकरमधून अनेक तोळे सोने गायब झाले आहे. हे सोने आणि लॉकर कोणाकडे आहे, असा प्रश्न पीडित महिलेने केला आहे. लॉकर उघडले असता बरेचसे सोने गायब झालेले तिलाआढळले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने बँकेच्या लॉकरमध्ये सुमारे 30 ते 35 तोळे सोने ठेवले होते. घरी लग्न असल्याने ते घेण्यासाठी दोघी बहिणी आल्या होत्या. त्या तिघी बहिणी असून हे सोने बँकेत ठेवलेले तीन बहिणींचे असल्याचे तिचे  म्हणणे आहे. काय झाले हे त्यांना कळत नाहीये. मात्र, या प्रकरणाबाबत डायल 112 चे पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली.

हे ही वाचा: 'इग्नोर कर, झोप तू...' TCS कर्मचारी मानव शर्माची पत्नी आणि बहिणीचे 'त्या' रात्रीचे व्हॉट्सॲप चॅट Viral

 

घटनास्थळी दाखल होत आणि परिस्थितीचा आढावा घेत शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली आहे. पुढील तपास सुरु झाला आहे. आमचे सोने बँकेतून गायब झाले असे कसे होऊ शकते, असे पीडित महिलेचे म्हणणे आहे. सोने ठेवलेल्या मोठ्या पर्स रिकाम्या होत्या आणि छोट्या पर्समध्ये काही सोन्या-चांदीचे दागिने होते पण मुख्यतः त्यांचे सोन्या-चांदीचे दागिने गायब होते. 

हे ही वाचा: IND vs AUS: घटस्फोटाच्या काही महिन्यातच हार्दिकला मिळाली गर्लफ्रेंड? सिक्सरवर दिली खास प्रतिक्रिया,Video Viral

 

काय म्हणाले बँकेचे अधिकारी? 

या महिलेने सांगितले की, आम्ही बँकेचे अधिकारी आणि व्यवस्थापक यांना संपूर्ण प्रकरण सांगितल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, पूर्वी त्यांची बँक ओबीसीमध्ये होती, त्यानंतर जेव्हा ते पंजाब नॅशनल बँकेत मर्ज झाले तेव्हा त्यांचे लॉकर आपोआप येथे आले.

हे ही वाचा: स्टीव्ह स्मिथ आऊट होताच गौतम गंभीरला काय झालं? ड्रेसिंग रुममधून शिवी देतानाचा Video Viral

 

या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पीडिता ही सुभाष गेट येथील रहिवासी असून, त्यांच्या परिसरात चोरीच्या घटना घडत असल्याचे पीडित बहिणींचे म्हणणे आहे, त्यामुळे त्यांनी हे सोने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More