नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये ज्या मदरशांमध्ये १५ ऑगस्टला राष्ट्रगीत नाही गायलं गेलं त्या मदरशांविरोधात योगी सरकार कडक कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील मदरशा शि‍क्षा परिषदेने ३ जुलैला राज्यातील सर्व मदरशांना एक पत्रक जारी केलं होतं. १५ ऑगस्टला मदरशांमध्ये तिरंगा फडकवण्याचे आदेश दिले होते आणि त्याची ऑडिओग्राफी देखील करण्यास सांगितलं होतं.


अनेक ठिकाणी याचं पालन केलं गेलं. पण काही ठिकाणी राष्ट्रगीत गायलं गेलं नाही अशा मदरशांवर सरकार कायदेशीर कारवाई करणार आहे. बरेलीच्या काजी मौलाना असजद रजा खानने आधीच जाहीर केलं होतं की, राष्ट्रगीत गैरइस्लामी आहे. कारण यामध्ये असे काही शब्द जे गैरइस्लामी आहे. याशिवाय दरगाह आलाहजरकडून मदरशांना राष्ट्रगीत न गाण्याचे आदेश देखील देण्यात आले होते.