वराती राहिले बाजूला, नवरा-नवरीचा भर रस्त्यात जबरदस्त डान्स

 भारतात लग्न हे एखाद्या मोठ्या सण किंवा उत्सवापेक्षा कमी नसते. 

Updated: Sep 19, 2021, 02:15 PM IST
वराती राहिले बाजूला, नवरा-नवरीचा भर रस्त्यात जबरदस्त डान्स

मुंबई : भारतात लग्न हे एखाद्या मोठ्या सण किंवा उत्सवापेक्षा कमी नसते. यामध्ये खाण्यापिण्याचे, महागडे कपडे-दागिने, नृत्य, गायन-वादन, रडणे-साजणं अशा अनेक गोष्टी आहेत. आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतीय लग्नांच्या व्हायरल व्हिडिओंनी भरलेले आहेत. यामध्ये नृत्य-गाण्यांचे व्हिडिओ, विधी, वधू-वरांच्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया इत्यादींचा समावेश आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात वधू आणि वर त्यांच्या लग्ना नंतर भयंकर नाचताना दिसत आहेत.

वधू आणि वर रस्त्यावर नाचू लागले
इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, वधू आणि वर रस्त्याच्या कडेला उभे राहतात आणि नंतर ते अचानक नाचू लागल्याचे दिसून येते. या वधू -वरांना आनंदाने डोलताना पाहून लोकही हसायला लागतात. ढोल आणि गाण्याच्या तालावर नाचणाऱ्या या वधू -वरांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लोकांना वधूचा डान्स आवडला
लोकांना वधूचा हा स्ट्रीट स्टाइल डान्स खूप आवडतो. या व्हिडिओमध्ये वधूचा पूर्ण चेहरा दिसत नसला तरी तिच्या नृत्याची चाल पाहूनच तिच्या आनंदाचा अंदाज लावला जाऊ शकतो. या व्हिडिओला अनेक लाईक्स मिळाले आहेत आणि लोक कमेंट बॉक्समध्ये वधूच्या नृत्याचे कौतुक करत आहेत.