मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरनंतर 'ते' सर्व विद्यार्थी तपास यंत्रणांच्या रडारवर

Operation Sindoor: भारताने पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यानंतर पाकिस्तानही शांत बसणार नाही. त्यामुळे आता तपास यंत्रणांच्या रडारवर ते सर्व विद्यार्थी आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Nov 13, 2025, 01:45 PM IST
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरनंतर 'ते' सर्व विद्यार्थी  तपास यंत्रणांच्या रडारवर

Operation Sindoor: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत. त्यानंतर पाकिस्तानही शांत बसणार नाहीत. हे लक्षात घेत ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू-काश्मीर सोडून देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेले लोक तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी, पाकिस्तानी कट्टरपंथी संघटनांनी जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या कार्यकर्त्यांना भारतातील विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंबाचा बदला घेण्यासाठी जैश-ए-मोहम्मद भारतात आपले पाय पसरवत आहेत. ते विविध सोशल मीडिया साइट्सद्वारे जैशशी जोडले होते.

आता, गेल्या काही महिन्यांत देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेले जम्मू-काश्मीरमधील सर्व तरुण तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. तपास यंत्रणांना अशी माहिती मिळाली आहे की हे कट्टरपंथी उत्तर प्रदेशात आय लव्ह मुहम्मद चळवळ नियोजित प्रमाणे पसरवू शकले नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन क्लीनची तयारी सुरु करण्यात आली आहे. 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More