Ahmedabad Plane Crash: ATS च्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा; मलब्यात पडली होती 'ही' गोष्ट, उलगडणार विमान दुर्घटनेचं रहस्य

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान विमानाच्या मलब्यात डीव्हीआर सापडला आहे, ज्याला डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डरही म्हटलं जातं.  

शिवराज यादव | Updated: Jun 13, 2025, 05:03 PM IST
Ahmedabad Plane Crash: ATS च्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा; मलब्यात पडली होती 'ही' गोष्ट, उलगडणार विमान दुर्घटनेचं रहस्य

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. ब्लॅक बॉक्सच्या आधारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जाईल. यादरम्यान विमानाच्या मलब्यात डीव्हीआर सापडला आहे. पण हा डीव्हीआर नेमका काय असतो? आणि त्याच्या माध्यमातून कोणती माहिती मिळू शकते असा प्रश्न समोर येत आहे. यानिमित्ताने हा डीव्हीआर नेमका कशाप्रकारे काम करतो हे जाणून घ्या. 

'मी उडी मारली नाही, तर....', दुर्घटनेतून बचावलेला एकमेव प्रवासी रमेशने सांगितला सगळा घटनाक्रम, 'माझ्या डोळ्यांसमोर एअर होस्टेस...'

 

गुजरातच्या एटीएसने अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडिया विमानाच्या मलब्यातून डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (डीव्हीआर) मिळवला आहे. एटीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, "हा डीव्हीआर आम्ही मलब्यातू मिळवला आहे. एफएसएल टीम लवकरच येथे येईल".

काय असतो डीव्हीआर?

डीव्हीआर म्हणजे डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर असतो. याचं काम विमानाच्या हालचालींची नोंद ठेवणं असतं. हे डिव्हाईस केबिन, कॉकपिट आणि बाहेरील भागांचं रेकॉर्डिंग करतं. यामध्ये विमान प्रवासादरम्यान होणाऱ्या घडामोडींचा व्हिडीओ डेटा असतो.या डेटाच्या माध्यमातून विमानात बसलेले प्रवासी आणि क्रू मेम्बर्स यांच्या हालचालींवर लक्ष  ठेवलं जाऊ शकतं  आणि नंतर पाहिलं जाऊ शकतं. 

Ahmedabad Plane Crash: रमेश विश्वासकुमार नव्हे तर ही आहे जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती; 7 वेळा मृत्यूला दिली आहे हुलकावणी

हाच ब्लॅक बॉक्स आहे का?

अनेकजण हाच ब्लॅक बॉक्स असल्याचं समजत आहेत. पण याला ब्लॅक बॉक्स म्हणू शकत नाही. पण हा ब्लॅक बॉक्सची मदत करतो. दोन असे डिव्हाईस असतात ज्यांनी ब्लॅक बॉक्स नाव दिलं जातं. या दोन डिव्हाईसमध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट वॉइस रेकॉर्डर (CVR) असतात. जेव्हा त्यात डीव्हीआर सामील होतो तेव्हा तो यामध्ये डेटा व्हिडीओ देण्याचं काम करतो.

मग FDR आणि CVR काय करतात?

FDR चा अर्थ फ्लाइट डेटा रेकॉर्डर आहे. हे विमानाशी संबंधित डेटा रेकॉर्ड करतं. यामध्ये विमानाची उंची, वेग, इंजिनची कामगिरी आणि कंट्रोल इनपूट यांचा समावेश आहे. FDR विमानाच्या हालचालींचा डेटा ठेवतं. यामुळे विमान नेमकं कशाप्रकारे उड्डाण करत होतं आणि कशामुळे दुर्घटना झाली असावी हे समजण्यास मदत होते.

तसंच CVR म्हणजे कॉकपिट वॉईस रेकॉर्डर असतो. हे कॉकपिटमध्ये पायलटचं संभाषण, रेडिओ प्रसारण आणि मागील आवाज रेकॉर्ड करतं. यामुळे पायलटच्या हालचाली, क्रूमध्ये झालेलं संभाषण, पायलटचे कॉल्स यांच्यासंदर्भात माहिती मिळते.

या दोन्ही डिव्हाईसला ब्लॅक बॉक्स म्हटलं जातं. यामध्ये डीव्हीआर एक अतिरिक्त डिव्हाइस म्हणून काम करतं. हे डेटा व्हिडीओ प्रकारात देण्याचा प्रयत्न करतं. पण हा ब्लॅकबॉक्सचा महत्त्वाचा भाग नाही आणि प्रत्येक विमानात असेल हे गरजेचं नाही.