Ahmedabad Plane Crash Video : गुजरातमधील अहमदाबाद येथे मोठी दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये एअर इंडियाचे विमान हे लंडनसाठी रवाना झाल्यानंतर ते काही मिनिटांमध्येच क्रश झाले. या दुर्घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये विमान क्रॅश होताच तेथील परिसरात निघणारा धूर आणि जमिनीवर पसरलेले विमानाचे फोटो हे देखील खूपच भयावह आहेत. या विमानात एकूण 242 प्रवासी होते. ज्यामध्ये 2 पायलट आणि 10 केबिन क्रू यांचा समावेश आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणार्या व्हिडीओमध्ये सर्वत्र धूळ, धूर आणि राख पसरलेली दिसत आहे. ज्या ठिकाणी विमान क्रॅश झाले त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. या घटनेतील जखमींना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्याचबरोबर आकाशात मोठ्या प्रमाणात धूर झाल्याचं दिसत आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरु
घटनास्थळी एसडीआरएफ पोलीस, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. मोठ्या ताकदीने बचावकार्य सुरु आहे. रुग्णवाहिकेचे सायरन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पाहून तेथील प्रत्येक सेकंद मौल्यवान असल्याचं दिसत आहे. युद्धपातळीवर जखमींना तेथील आसपासच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासोबत अनेक लोक या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
#WATCH | Air India plane crashes in Ahmedabad; Thick smoke and dust emerge as an impact of the plane crash pic.twitter.com/JLPApIfPnU
— ANI (@ANI) June 12, 2025
अपघातानंतरचा व्हिडीओ व्हायरल
अशातच आता सोशल मीडियावर या अपघातानंतरचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तेथील आजूबाजूचा परिसर देखील दिसत आहे. ज्यामध्ये सर्व ठिकाणी धूळ आणि धूर पसरलेला दिसत आहे. सध्या या ठिकाणी बचाव पथक हे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना वाचवण्यासाठी अनेक जण मदत करताना दिसत आहेत.
#WATCH | Debris at Air India plane crash site in Ahmedabad; Fire Services and other agencies present at the site
Air India B787 Aircraft VT-ANB, while operating flight AI-171 from Ahmedabad to Gatwick, has crashed immediately after takeoff from Ahmedabad. There were 242 people… pic.twitter.com/zn3ZMsJjCi
— ANI (@ANI) June 12, 2025
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(29 ov) 99/6 (70.3 ov) 225
|
VS |
WI
143(52.1 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.