हैदराबाद : देशातील अनेक राज्यांमध्ये मॉब लिंचिंगच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. मोठ्या संख्येने एक जमाव येतो आणि कोणत्याही व्यक्तिला लक्ष्य करत मारहाण करू लागतो. या जमावावर अनेकदा पोलिसांचेही नियंत्रण नसते. आतापर्यंत या गोष्टी रस्त्यावर घडताना दिसत होत्या. मात्र, पण, आता या घटना पोलीस स्टेशनमध्येही घडू लागल्याचे पुढे आले आहे. हैदराबादमध्येही एक प्रकार असाच घडला. बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या एका व्यक्तिवर पोलिसांच्या उपस्थितीतच लोकांनी हात उचलला. त्या वक्तीला मारहाण करून गंभार जखमी करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष असे की, हा प्रकार चक्क एका आमदारानेच केला. हैदराबाद येथील चादर घाट पोलीस स्टेशनमध्ये एआयएमआयएमचे आमदार अहमद बिलाल यांनी आपल्या समर्थकांना घेऊन आरोपीवर पोलीस स्थानकातच हल्ला केला. मलकपेटचे आमदार असलेले बिलाल हे आरोपीला भेटण्यासाठी पोलीस स्थानकात गेले असता हा प्रकार घडला. आरोपीला पाहताच आमदार आणि त्यांचे समर्थक त्याच्यावर तूटून पडले.



ज्या ठिकाणी आरोपीला ठेवण्यात आले होते, तेथे पोलीसही हजर होते. मात्र, बघ्याची भूमिका घेण्याशीवाय पोलीस काहीच करू शकले नाहीत. काही वेळानंतर आमदार आणि त्याचे समर्थक बाहेर गेले आणि आरोपीची सुटका झाली.


दरम्यान,या घटनेबाबतचा एक व्हडिओही पुढे आला आहे. या व्हिडितो १० ते १२ लोक पोलीस स्टेशनमधली ओरोपीला मारहाण करताना दिसत आहेत. आरोपीला मारहाण करताना काही वेळ अंधारही केल्याचे व्हिडिओत दिसते. ही घटना रविवारी (१३ मे) ला घडल्याचे समजते. आरोपीवर ६ महिन्यांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असून, तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.