Air India London Flight News: एअर इंडियाच्या विमानात पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लंडनहून मुंबईत येणा-या विमानातील पाच प्रवासी, दोन केबिन क्रू बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे. मुंबईत या विमानाचे लँडिंग झाले. या प्रकारामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अमदाबाद लंडन विमान दुर्घटनेत 242 प्रवाशांचा मृत्यू झाला. हे दुर्घचनाग्रस्त विमान एअर इंडियाचे होते. यानंतर एअर इंडियाच्या विमानांच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.
AI130 हे विमान लंडन हीथ्रोहून मुंबईला येत होते. या प्रवासा दरम्यान विमानात, पाच प्रवाशांनी आणि दोन कर्मचाऱ्यांनी उड्डाणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चक्कर येणे आणि मळमळ होणे अशी तक्रार नोंदवली. मुंबई विमानतळावर या प्रकाराची माहिती देण्यात देण्यात आली. मुंबई विमानतळावर AI130 या विमानाचे सुरक्षित लँडिग करण्यात आले. विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरल्यानंतर वैद्यकीय पथक तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी सज्ज होते अशी माहिती मुंबई विमानतळ मॅनेजमेंटकडून देण्यात आली.
विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर दोन प्रवाशांना आणि दोन केबिन क्रू, ज्यांना अजूनही अस्वस्थ वाटत होते, त्यांना पुढील तपासणीसाठी वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत आणि नियामकाला योग्यरित्या कळवले आहे.” - एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी सांगितले. प्रवासी तसेच क्रू मेंबर यांना हा त्रास नेमका कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
'एअर इंडिया' च्या बोईंग 787 विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार घडला. ही घटना 1 जून रोजी घडली होती, मात्र त्याविषयी अलिकडेच माहिती मिळाली. विमान हवेत असतानाच त्याचा दरवाजा हलू लागला आणि त्यातून आवाज येऊ लागले. त्यामुळे विमानातील प्रवाशांची तारांबळ उडाली होती... दरवाजा घट्ट बसवण्यासाठी विमानातील कर्मचा-यांनी त्याच्या वरील बाजूच्या फटीत टिश्यू पेपर भरल्याची माहिती आहे... या धडकी भरवणा-या प्रकारानंतरही ते विमान हाँगकाँगमध्ये सुखरूप उतरले होते.. अहमदाबाद दुर्घटनेपूर्वी हा प्रकार असल्याची माहिती आहे.
IND
387(112.3 ov)
|
VS |
ENG
316/5(91 ov)
|
Full Scorecard → |
TAN
(18.4 ov) 140
|
VS |
GER
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.