Air India Plane Crash : अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोईंग विमान उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळलं.या विमानातून 242 जण प्रवासी करत होते. त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला. 12 जून 2025 रोजी ही दुर्घटना घडली. Air India Plane Crash नंतर 40000000000 रुपयांचा क्लेम करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. अहमदाबाद लंडन विमान दुर्घटना विमा कंपनीसाठी इतिहासातील सर्वात मोठा झटका मानला जात आहे. यामुळे विमा उद्योगात खळबळ उडाली आहे.
Air India Plane Crash नंतर जो क्लेम करण्यात आला आहे. त्या या दाव्याची अंदाजे किंमत 475 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 4 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी नारायणन यांनी ब्लूमबर्गला याबाबत माहिती दिली. हा विमान विमा दावा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा दावा असू शकतो. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एअर इंडियाला कव्हर देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
विमानाच्या बॉडीचा आणि इंजिनचा विमा काढण्यात आला होता. एक हजार कोटींचा हा इन्श्युरन्स आहे. प्रवाशांच्या आणि इतरांच्या जीवितहानीबद्दल अतिरिक्त दावे हे 3 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असतील असा रामास्वामी नारायणन यांचा अंदाज आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, हा खर्च 2023 मध्ये भारतातील विमान वाहतूक उद्योगाच्या वार्षिक प्रीमियमच्या तिप्पट आहे.
अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेचा आर्थिक परिणाम संपूर्ण जागतिक विमान वाहतूक विमा आणि पुनर्विमा बाजारावर होऊ शकतो. ब्लूमबर्गच्या मते, यामुळे भारतातील विमान कंपन्यांसाठी विमा महाग होण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या सूत्रांनुसार, भारतातील विमान वाहतूक उद्योगातील विमा प्रीमियम आता किंवा पॉलिसी नूतनीकरणादरम्यान वाढण्याची अपेक्षा आहे. एअर इंडियाच्या विमा पेमेंटवर, एकूण खर्च वाढू शकतो कारण परदेशी नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्या दाव्यांची गणना त्यांच्या संबंधित देशांच्या नियमांनुसार केली जाईल यामुळे क्लेमच्या रकमेचा आकडा वाढू शकतो आणि विमा कंपनीला मोठा आर्थिक फटका बसू शकतो असी देखील शक्यता वर्तवली जात आहे.
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.