जीवघेणी मस्करी! मित्रासोबतच केला घृणास्पद प्रकार, 19 वर्षांच्या तरुणाचा तडफडून मृत्यू
Today News In Marathi: एक छोटीशी मस्करी तरुणाच्या जीवावर बेतली आहे. या घटनेमुळं मोठा अनर्थ घडला आहे.
Today News In Marathi: अनेकदा आपण मस्करीत काही तरी करुन जातो आणि नंतर त्यातून भयानक घटना घडते. मनात तसा काही विचारही नसताना ती क्षुल्लक मस्करी मात्र जीवावर बेतते. अहमदाबाद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जीआयडीसी येथील कंपनीत हा प्रकार घडला आहे. इंजिनीयरिंग कंपनीत एका 19 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो बिहार येथील रहिवासी होता. मित्राच्या एका मस्करीमुळं त्याला जीव गमवावा लागला आहे.
या घटनेबाबत कंपनीचे ठेकेदार नारायण साहनी यांनी म्हटलं आहे की, पंकज असं मृत मुलाचं नाव आहे. त्याच्यासोबत प्रकाश नावाचा एक मुलगा काम करत होता. पंकजने कंपनीत काम करत असताना हिट एक्सचेंजरच्या मेन शेलवर ठेवलेली एअर कंप्रेसरची नळी प्रकाशला दिली होती. त्यानं म्हटलं होतं की, एअर कंप्रेसरची नळी लोखंडाजवळ असलेल्या बीमवर ठेवून त्याचा वॉल्व बंद कर.
पंकजने दिलेल्या सूचना ऐकून प्रकाशला त्याच्यासोबत मस्करी करण्याची हुक्की आली. त्याने पंकजने दिलेली ती एअर कंप्रेसरची नळी त्याने पंकजच्या गुप्तांगावर ठेवली. यामुळं सगळी हवा त्याच्या शरीरात गेली आणि पाहता पाहता त्याचे पोट फुगत गेले आणि तो जागेवरचा बेशुद्ध पडला. तातडीने अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला उचलून कंपनीच्या मेन गेटकडे आणले. त्यानंतर त्याला बाइकवर बसवून खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
पंकजला तातडीने नंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात वटवी जीआयडीसी पोलिस स्थानकात मृत पंकजचे वडिल रवींद्र राय यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांत तक्रार दाखल
पंकज यांचे वडिलांना त्याच्या मृत्यूची माहिती त्याच्याच कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपनीत काम करणाऱ्या नातेवाईकांनी फोन करुन दिली. जेव्हा घटना घडली तेव्हा पंकजचे वडिल हैदराबाद येथे होते. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून ते तातडीने अहमदाबाद येथे पोहेचले. त्यानंतर त्यांनी पोलिसात याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणात पुढील चौकशी करत आहेत. मात्र, या घटनेने कंपनीत एकच खळबळ उडाली आहे. एका छोट्याश्या मस्करीमुळं इतका मोठा अनर्थ घडून शकतो यामुंळ सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.