बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज अयोध्येत गेलेला. अक्षयचा रामसेतू हा सिनेमा लवकरच येणार आहे. आज अक्षयने अयोध्येत रामलल्लांची पूजा केली, तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयने सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटलं आहे, ‘आज श्री अयोध्या मध्ये फिल्म रामसेतूचा शुभारंभ करण्यात आला आहे. भगवान श्री राम यांचे आशिर्वाद लाभले. जय श्री राम’



 


अक्षयच्या अयोध्या दौऱ्यावेळी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससुद्धा सोबत होती. फोटोमध्ये अक्षय आणि जॅकलिन भगवान राम यांच्यासमोर हात जोडलेले पाहायला मिळतात.


पूजेनंतर अक्षय कुमारने राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्यासोबतही चर्चा केली. अक्षय कुमारच्या फॅन पेजवर याचे फोटोजही शेअर करण्यात आले आहेत.


त्यासोबतच अक्षयने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी रामसेतू या सिनेमाबाबतही चर्चा केली.



 


रामसेतू या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूच्चा मुख्य भूमिकेत आहेत. आज या सिनेमाच्या शूटिंगचा मुहूर्त होता, आणि भगवान श्री राम यांच्यावर सिनेमा असल्यानं अयोध्येतूनच शूटिंगच्या मुहूर्ताला सुरूवात झाली.


या सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा असणार आहेत. अक्षय कुमार रामसेतू चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे.