अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा अपघात, 4 वाहनांची एकमेकांना धडक; 30 पेक्षा जास्त भाविक जखमी

अमरनाथ यात्रे दरम्यान एक अपघात घडला असून यात ४ वाहनांचं मोठं नुकसान झालं, तर 30 हुन अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय.   

Updated: Jul 5, 2025, 11:04 AM IST
अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा अपघात, 4 वाहनांची एकमेकांना धडक; 30 पेक्षा जास्त भाविक जखमी
Pooja Pawar

Amarnath Yatra Accident : जम्मू कश्मीरच्या रामबन जिल्ह्यात शुक्रवारी अमरनाथ यात्रे दरम्यान एक मोठा अपघात घडला. या अपघातात 4 वाहन एकमेकांना धडकली ज्यात 30 हुन अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. उपायुक्त DEO रामबनने सांगितलं की, पहलगामच्या ताफ्यातील शेवटच्या वाहनाचे चंद्रकोट लंगर स्थळी नियंत्रण सुटले आणि तो तिथे उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन आदळला. या धडकेत एकूण चार वाहनांचं नुकसान झालं असून भाविक जखमी झाली आहेत, सर्वांना तात्काळ वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

प्रशासन आधीच घटनास्थळावर दाखल : 

मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासन यापूर्वीच घटनास्थळावर उपस्थित होते. अपघातात जखमी झालेल्या भाविकांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचार केल्यावर सर्व श्रद्धाळूंना वेगळ्या वाहनाने पुढील प्रवासाला पाठवण्यात आले. प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मदत आणि बचाव कार्य वेगाने हाती घेतले. ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. 

26,800 हून अधिक भक्तांची पवित्र गुहेला भेट : 

पवित्र अमरनाथ गुहेसाठी यात्रा 3 जुलै रोजी सुरू झाली आहे. 39 दिवसाचा प्रवास 9 ऑगस्ट रोजी श्रावण पूर्णिमा आणि रक्षा बंधनच्या समवेत संपन्न होईल. भक्त 3,888 मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहेत पोहोचण्यासाठी पहलगाम आणि बालटाल अशा दोन मार्गांपैकी एक निवडतात. पहलगम मार्गावरून प्रवास करणारे भक्त चंदनवाडी, शेशनाग आणि पंचरानी मार्गे एकूण 46 किमी अंतरावर प्रवास करतात.

हेही वाचा : मध्यरात्री उद्योजकाच्या हत्येने शहर हादरलं! 6 वर्षांपूर्वी मुलाची सेम-टू-सेम झाली होत्या हत्या

अमरनाथ यात्रा सुरू झाल्यापासून 26,800 हून अधिक भक्तांनी दोन दिवसांत पवित्र गुहेला भेट दिली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने यात्रेमध्ये सुरक्षा आणि सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून यापुढे कोणताही अपघात होणार नाही. प्रवाशांना प्रवासाच्या नियमांचे पालन करण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सक्तीने पालन करावे अशी विनंती पोलिसांनी केली आहे.