Asian Games 2023 :  एशियन गेम्समध्ये भारताचा दबदबा पहायला मिळाला. भारतीय खेळाडूंनी तब्बल 107 पदकांची लयलूट केली आहे. भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  रतन टाटा, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह इतर अनेक कॉर्पोरेट्स यांच्या सहकार्यामुळे भारतीय खेळांडूना हे यशाचे शिखर गाठता आले.  Ambani-Adani-Tata यांच्या मदतीमुळे हे शक्य झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी ग्रुप, टाटा ग्रुप याशिवाय जेएसडब्ल्यू ग्रुपने देखील आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या बहुतांश खेळाडूंना  पाठिंबा दिला आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी ग्रुप, टाटा ग्रुप तसेच जेएसडब्ल्यू ग्रुपने खेळाडूंना तयारीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण दिले. याशिवाय कॉर्पोरेट्सनी त्यांना प्रायोजकत्व, शिष्यवृत्ती आणि इतर माध्यमातून मदत केली आहे. यासर्वांच्या सहकार्यामुळेच यावेळी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे.


रिलायन्स ग्रुपमुळे मिळाली 12 पदके 


रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी रिलायन्स फाऊंडेशन चालवतात. या फाऊंडेशनच्या माध्यमातून खेळाडूंना मदत केली.  रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी देशासाठी 12 पदके जिंकली आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून खेळाडूंन प्रोत्साहन दिले जाते.  रिलायन्स फाऊंडेशन भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख भागीदार आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून देशातील 10 हून अधिक खेळांमधील 200 हून अधिक खेळाडूंना शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिले जाते.


JSW ग्रुपच्या मदतीमुळे भारताने जिंकली 4 सुवर्ण पदके 


जिंदाल स्टील वर्क्स ग्रुपच्या सहकार्यामुळे खेळाडूंनी आशियाई खेळांमध्ये एकूण 17 पदके जिंकली आहेत. यामध्ये 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. JSW समूहाची क्रीडा शाखा देशभरातील 4,000 हून अधिक खेळाडूंना सर्व सहकार्य करते. ट्रॅक स्पोर्ट्स व्यतिरिक्त ज्युडो, कुस्ती, बॉक्सिंग आणि स्वीमींग या सारखे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना देकील मदत केली जाते. जेएसडब्ल्यू ग्रुपच्या इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या माध्यामातून खेळाडूंना प्रशिक्षण तसेच आवश्यक मदत केली जाते. JSW ग्रुप नीरज चोप्रा, अविनाश साबळे आणि पारुल चौधरी या खेळाडूंचे प्रायोजक आहे.


अदानी-टाटाचे देखील मोठे योगदान


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या यशस्वी कामगिरीत अदानी-टाटा यांचे देखील मोठे योगदान आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना टाटा ग्रुप आणि अदानी ग्रुप यांनी पाठिंबा दिला.  आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या दीपक पुनियाला अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायोजित करते. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी अदानी समूह भारतीय संघाचा प्रमुख प्रायोजक देखील आहे. अदानी ग्रुप प्रमाणेच टाटा ग्रुपची कंपनी टाटा स्टील देशात टाटा आर्चरी अकादमी चालवते. अंकिता भकट आणि भजन कौर या कॅडेट्सने आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्यात मदत केली आहे. या खेळाडूंनी या अकादमीमध्येच प्रशिक्षण घेतेले.