American weapons: पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांकडं अत्याधुनिक शस्त्रं असल्याची माहिती मिळालीये.अमेरिकन मेड अत्याधुनिक M-4 रायफलमधून निष्पापांवर गोळीबार झाला. ज्या पाकिस्तानमध्ये डाळ, तांदूळ मिळत नाहीत तो पाकिस्तान दहशतवाद्यांच्या हाती अमेरिकन मेड हत्यारं देत असल्याचं स्पष्ट झालंय.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोरांनी अत्याधुनिक शस्त्रं वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर जो हल्ला केला तो हल्ला अत्याधुनिक शस्त्रांद्वारे केल्याचं सांगण्यात येतंय. चार हल्लेखोरांपैकी एकाजवळ अत्याधुनिक M-4 रायफल असल्याचं सांगण्यात येतंय. अमेरिकन लष्कराकडं असलेली हा रायफल भारताच्या स्पेशल फोर्सेसच्या जवानांकडंच असते. ही रायफल काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांकडं कशी आली? असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय. पाकिस्तानच काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांना पोसत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
गेल्या काही वर्षांपासून काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांकडं अत्याधुनिक शस्त्रं आल्याचं पाहायला मिळतात. थेट अमेरिकन मेड आणि चायना मेड हत्यारं या दहशतवाद्यांना देताना पाकिस्तानही मागं पुढं पाहत नसल्याचं दिसतंय. दहशतवाद्यांकडं आलेल्या अत्याधुनिक हत्यारांची यादीही मोठी आहे.
पाकिस्तान स्वतः भिकेकंगाल देश झालाय. पाकिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये तालिबानची सत्ता आहे. बलुचिस्तानसारख्या प्रांतात स्वतंत्र बलुचिस्तानची चळवळ मूळ धरतेय. आर्थिकदृष्ट्या हालाखीची परिस्थिती असलेल्या पाकिस्तानला देशातील जनतेला खायला द्यायला गहू तांदूळ नाही. मात्र काश्मीरमधील दहशतवाद्यांना पोसण्य़ासाठी त्यांच्याकडं पैसा आहे. भाकरीपेक्षा दहशतवादाला पोसणा-या पाकिस्तानचा एक दिवस भस्मासूरासारखा अंत होण्याची शक्यता आहे.