)
Amitabh's Life in Danger : बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर येत आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या जीवाला धोका असल्याचे वृत्त समोर येत आहे. खलिस्तानी संघटना 'सिख्स फॉर जस्टिस'च्या निशाण्यावर आता बिग बी आहेत. झालं असं की, प्रसिद्ध पंजाबी चित्रपटसृष्टीतील अभिनेता दिलजीत दोसांझ अलीकडेच कौन बनेगा करोडपती 19 मध्ये आला होता. यावेळी दिलजीत दोसांज हा अमिताभ बच्चन यांच्या पाया पडला आणि खूप गप्पा मारल्यात. दिलजीत दोसांज बिग बींच्या पाया पडल्याचे कृत्य खलिस्तानी संघटना 'सिख्स फॉर जस्टिस'ला पसंत पडलं नाही. त्यानंतर संघटनेने गायकाला फटकारले आणि त्यांच्या आगामी संगीत कार्यक्रमाला लक्ष्य केलं. भारतीय तपास संस्थांनुसार, दिलजीत दोसांझचा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर बिग बींच्या जीवाला धोका असल्याचे सांगितलं जातंय.
खरंतर, दिलजीत दोसांज कौन बनेगा करोडपती 19 च्या एका एपिसोडमध्ये दिसला होता. जिथे त्याने बिग बींचे खूप कौतुक केलं. एक क्षण असा आला जेव्हा त्याने बिग बींच्या पाय स्पर्श करुन आशिर्वाद घेतला. दिलजीत दोसांजने बिग बींना आदर दाखवण्यासाठी हे कृत्य केलं होतं. पण त्याचे वर्तन खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसला आवडले नाही. एपिसोड प्रसारित झाल्यानंतर लगेचच खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसने दिलजीतला धमक्या देण्यास सुरुवात केली. भारतीय तपास संस्थांनी या धमक्यांची चौकशी केली आणि बिग बींच्या जीवालाही धोका असल्याचे संकेत दिले आहेत.
शीख विरोधी दंगलीतील पीडितांचा अपमान केल्याचा आरोप शीख फॉर जस्टिसने दिलजीतवर केला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बिग बींचे पाय स्पर्श करणे हा इतका मोठा मुद्दा कसा बनला आहे, तर एसएफजेने असा आरोप केला आहे की, 1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या दंगली भडकवण्यात अमिताभ बच्चन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. संघटनेचा दावा आहे की 1984 च्या दंगलींमध्ये अमिताभ बच्चन यांनी "रक्ताच्या बदल्यात रक्त" असा नारा दिला होता, ज्यामुळे उत्तर भारतात हिंसाचार झाला. 1984 च्या दंगलींमध्ये 30,000 हून अधिक शीख मारले गेले होते. खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसने 1984 च्या दंगली भडकवल्याचा आरोप बिग बींवर केला असला तरी, बिग बी यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर वारंवार सांगितलंय की त्यांच्यात शीख रक्त आहे कारण त्यांची आई तेजी बच्चन शीख आहेत. त्यामुळे माझ्या या प्रकरणाशी काही संबंध नाही.
प्रश्न १: अमिताभ बच्चन यांच्या जीवाला धोका का आहे?
उत्तर: बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना खलिस्तानी संघटना 'शीख फॉर जस्टिस' (SFJ) ने धमकी दिली आहे. भारतीय तपास संस्थांच्या माहितीनुसार, कौन बनेगा करोडपती (KBC) १९ मधील एका एपिसोडनंतर बिग बींच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
प्रश्न २: दिलजीत दोसांझ आणि KBC चा यात काय संबंध आहे?
उत्तर: दिलजीत दोसांझ KBC १९ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या एपिसोडमध्ये आले होते. तेथे त्याने बिग बींचे कौतुक करत पाय स्पर्श केले आणि आशीर्वाद घेतला. हे वर्तन SFJ ला आवडले नाही, त्यानंतर त्यांनी दिलजीतला धमक्या दिल्या आणि त्यांच्या ऑस्ट्रेलियातील संगीत कार्यक्रमाला लक्ष्य केले.
प्रश्न ३: शीख फॉर जस्टिसने दिलजीत दोसांझवर काय आरोप केले?
उत्तर: SFJ ने दिलजीत दोसांझवर १९८४ च्या शीख विरोधी दंगलीतील पीडितांचा अपमान केल्याचा आरोप केला. अमिताभ बच्चन यांचे पाय स्पर्श करणे हे दंगली भडकवणाऱ्यांना आदर देण्यासारखे असल्याचा दावा त्यांनी केला.