9 जुलैला संपूर्ण भारतातील वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या दोन वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाविरुद्ध सुमारे 27 लाख वीज क्षेत्रातील कर्मचारी 9 जुलै रोजी देशव्यापी संपावर जाणार आहेत. ज्यामुळे संपूर्ण भारतातील वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर्स फेडरेशनचे (AIPEF) अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी सांगितलं आहे की, उत्तर प्रदेश सरकारने पूर्वांचल विद्युत वितरण निगम लिमिटेड (PVVNL) आणि दक्षिणांचल विद्युत वितरण निगम लिमिटेड (DVVNL) यांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही वीज कंपन्या एकत्रितपणे राज्यातील 75 पैकी 42 जिल्ह्यांना व्यापतात.
"राष्ट्रीय वीज कर्मचारी आणि अभियंते समन्वय समितीकडून (NCCOEEE) करण्यात आलेल्या आवाहनानुसा, देशभरातील वीज कर्मचारी, कनिष्ठ अभियंते आणि अभियंत्यांनी वीज वितरण कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आहेत," असं दुबे म्हणाले आहेत.
खासगीकरणाच्या विरोधात 27 लाख वीज कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्याचा निर्णय घेतला आहे, असं दुबे म्हणाले. इतक्या मोठ्या प्रमाणात संप झाल्यास देशभरातील वीज पुरवठ्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. "जर वीज पुरवठ्यावर परिणाम झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही," असं ते म्हणाले आहेत.
राज्य सरकारने 12 जानेवारी रोजी जारी केलेल्या निविदेनुसार, उत्तर प्रदेश त्यांच्या चार वीज वितरण कंपन्यांपैकी दोन कंपन्यांचं खाजगीकरण करण्याचा विचार करत आहे. वारंवार होणारा वीज तोटा आणि पुरेशा ट्रान्समिशन पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात होतं.
राज्य खाजगी कंपन्यांना दक्षिणांचल विद्युत वितरण निगम आणि पूर्वांचल विद्युत वितरण निगम या सरकारी मालकीच्या कंपन्यांसोबत भागीदारी करण्यासाठी किंवा त्यांचे खाजगीकरण करण्यासाठी आमंत्रित करत आहे, या दोन्ही कंपन्या 21 जिल्ह्यांमध्ये वीज वितरणासाठी जबाबदार आहेत अशी माहिती निविदेत देण्यात आली होती.
भारतातील बहुतेक राज्य वीज वितरण कंपन्या जुन्या ट्रान्समिशन सिस्टीममुळे आणि वारंवार वीज तोट्यामुळे तोटा सहन करत आहेत, त्यामुळे सरकारने खासगी कंपन्यांचा पर्याय निवडत आहे. गेल्या वर्षी, केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी राज्यांना त्यांच्या नफा कमावणाऱ्या वीज कंपन्यांची स्टॉक एक्स्चेंमध्ये लिस्ट करण्यास सांगितलं होते जेणेकरून या क्षेत्रातील वाढती गुंतवणूक मागणी पूर्ण करता येईल आणि अधिक अक्षय क्षमता जोडण्यासाठी ट्रान्समिशन सिस्टीम सुधारता येतील.
नवी दिल्ली आणि ओडिशामध्ये वीज वितरणात आधीच खासगी-सार्वजनिक भागीदारी आहे. टाटा पॉवर ही ओडिशा तसेच दिल्ली आणि मुंबईमध्ये कार्यरत असलेली एक प्रमुख खाजगी कंपनी आहे.
9 जुलै रोजी होणारी निदर्शने प्रामुख्याने हैदराबाद, तिरुवनंतपुरम, विजयवाडा, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, नागपूर, रायपूर, भोपाळ, जबलपूर, वडोदरा, राजकोट, गुवाहाटी, शिलाँग, कोलकाता, भुवनेश्वर, पटना, रांची, श्रीनगर, जम्मू, शिमला, देहरादून, पटियाला, जयपूर, कोटा, हिसार आणि लखनऊ येथे होणार आहेत.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
LES
(19.3 ov) 60
|
VS |
BOT
61/4(11 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 255/5
|
VS |
NZ
159(19 ov)
|
| India beat New Zealand by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 130/7
|
VS |
MAS
128(19.5 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 2 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.