औरंगाबाद : एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात भाजपकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी तक्रार दाखल केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची जोरदार मागणी भाजपकडून करण्यात आली. इम्तियाज जलील यांच्यावर सात वाजेपर्यंत गुन्हा दाखल नाही झाला तर रस्त्यावर उतरण्याचा ईशारा भाजपने दिला होता. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्या वर पॅंडामिक ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  



कलम 188, कलम 269, कोविड 11 , कलम 144 म्हणजे जमावबंदी आदेश उल्लंघन, संसर्ग पसरवणे, मास्क वापरला नाही, गर्दी केली असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे जलील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान त्यांना अटक करण्यात येईल असा कोणता गुन्हा यात नसल्याचेही सांगण्यात येतंय.