अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Ayodhya Ram Mandir Threat: अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत.

नेहा चौधरी | Updated: Apr 15, 2025, 07:05 PM IST
अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Ayodhya Ram Mandir Threat : भारतातील प्रसिद्ध अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकीचा मेल आला आहे. राम मंदिर ट्रस्टला हा मेल आला आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं आहे. राम मंदिर ट्रस्टसह उत्तर प्रदेशातील 10-15 जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकाऱ्यांनाही अधिकृत ईमेलवर ही धमकीचा मेल आला आहे. याप्रकरणी अयोध्येच्या सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. हा ईमेल तामिळनाडूतून आल्याने सांगण्यात आले आहे.

सोमवारी रात्री राम मंदिराचे व्यवस्थापन करणारी संस्था राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मेलमध्ये ही धमकी मिळाली. धमकीच्या मेलमध्ये असे लिहिले होते की, अधिकाऱ्यांनी मंदिराची सुरक्षा वाढवावी. पोलिसांनी सांगितले की, तामिळनाडूतील एका व्यक्तीने इंग्रजीत ईमेल लिहिला होता, असे वृत्तसंस्था पीटीआयने दिले आहे. बाराबंकी आणि चंदौलीसह इतर अनेक जिल्ह्यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. (Ayodhya Ram Mandir temple bomb Threat mail Security agencies on alert)

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराभोवती सुमारे चार किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत उभारली जात आहे आणि ती 18 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे राम जन्मभूमी मंदिर इमारत बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सोमवारी सांगितले.

राम मंदिराच्या सुरक्षेसाठी आधीच तैनात असलेल्या सीआपीएफ आणि यूपीएसएसएफच्या तुकड्या आणखी मजबूत करण्यात आल्या. इंजिनीयर्स इंडिया लिमिटेड राम मंदिरासाठी सुरक्षा भिंत बांधेल. भिंतीची उंची, जाडी आणि डिझाइनबाबत अंतिम निर्णय झाला आहे. माती परीक्षणानंतर बांधकाम सुरू केले जाईल, असे ते म्हणाले. मिश्रा यांनी सूचित केले की राम मंदिराचे बांधकाम सहा महिन्यांत पूर्ण होण्याच्या दिशेने प्रगती करत आहे.