भारतातला सर्वात मोठा दानशूर...दर दिवसाला तब्बल 27 कोटींचं दान

अजीम प्रेमजी यांनी थोडंथोडकं नव्हे तर दिवसाला तब्बल 27 कोटींचं दान केलं आहे.

Updated: Oct 29, 2021, 10:59 PM IST
भारतातला सर्वात मोठा दानशूर...दर दिवसाला तब्बल 27 कोटींचं दान title=

मुंबई: दानाचं पुण्य खूप असतं, अशी म्हणण्याची पद्धत आहे. जगभरातील श्रीमंत व्यक्ती आपआपल्या परीनं सामाजिक कार्यात हातभार लावत असतात. भारतातही दानशुरांची संख्या मोठी आहे. मात्र त्यामध्ये एक नाव आवर्जुन घेण्यासारखं आहे ते म्हणजे अजीम प्रेमजी यांचं.

दानशुर लोकांची यादी दरवर्षीच प्रसिद्ध होत असते. आपल्या संपत्तीमधील काही टक्के वाटा गरीबांसाठी किंवा समाजपयोगी कामांसाठी देत असतात. मात्र यंदाच्या यादीचं वेगळेपण आहे. प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी भारतातील सर्वात मोठे दानशुर ठरले आहेत.

अजीम प्रेमजी यांनी थोडंथोडकं नव्हे तर दिवसाला तब्बल 27 कोटींचं दान केलं आहे. एडेलगिव हुरुन इंडिया फिलैंथ्रोपी 2021 च्या यादीनुसार त्यांनी तब्बल 9,713 कोटी रुपये दान केले आहेत. अजीम प्रेमजी दुस-यांदा भारताचे परोपकारी आणि दान देणा-या अब्जाधीशांमध्ये अग्रस्थानी आहेत. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत आपल्या दानात त्यांनी २३ टक्के वाढ केली आहे. अजीम प्रेमजी फाऊंडेशनने दहा राज्यांमध्ये कोरोना काळात मदत केली. लसीकरणाच्या कामासाठी 1,125 कोटींवरुन 2,125 कोटींपर्यंत मदत वाढवली. 

एचसीएल टेक्नोलॉजीचे संस्थापक-अध्यक्ष शिव नाडर यांनी पुन्हा एकदा 1,263 कोटींचं दान करुन यादीत दुसरा क्रमांक कायम राखला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी चालू वित्त वर्षात 577 कोटींचं दान केलं आहे. ते तिस-या स्थानावर आहेत. 

कुमार मंगलम् बिर्ला यांनी 377 कोटी रुपयाचं दान करुन चौथ्या स्थानावर आहेत. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी पाचव्या स्थानी आहेत. त्यांनी 183 कोटी रुपये दान केले आहेत. तर हिंदुजा परीवारानेही 166 कोटींचं दान केलं आहे. ते सहाव्या स्थानावर आहेत.

बजाज परिवाराने सढळ हस्ते मदत केली आहे. त्यांनी 136 कोटीचं दान केलं आहे. ते सातव्या स्थानी आहेत. आठव्या स्थानावर गौतम अदानी आणि अनिल अग्रवाल आहेत. 2011 मध्ये त्यांनी 130 कोटींचं दान केलं होतं. अगोदरच्या दानात 48 टक्के वाढ केली. मात्र आताच्या यादीनुसार त्यांनी 40 टक्के हात आखडता घेतला आहे. 

Tags: