Bank Holiday in January 2023: बँकेतील कामं पटापट उरकून घ्या, जानेवारीत बँका `इतके` दिवस बंद!
january 2023 bank closed: आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या महिन्यात बँका एकूण 13 बंद असणार ( List Of Bank Holiday) आहेत.
Bank Holiday in January: 2022 च्या अखेरच्या महिन्याला निरोप (bye bye 2022) देण्याची वेळ आली आहे. तीन दिवसांनंतर नववर्षाला (New Year) सुरूवात होईल. नव्या वर्षाच्या शुभमुहूर्तावर अनेकजण आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात. त्यामुळे अनेकांना बँकेच्या चकरा माराव्या लागतील. अशातच आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जानेवारी महिन्यातील (Bank Holidays In January 2023) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. (bank holiday in january 2023 bank closed for 13th days in month see list marathi news)
आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या महिन्यात बँका एकूण 13 बंद असणार ( (List Of Bank Holiday) आहेत. बँकेतील विविध राज्यातील सण आणि इतर कार्यक्रमांनुसार या सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या सुट्यांमध्ये साप्ताहिक सुट्टी (Weekly Holiday) तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा (Saturday Off) समावेश आहे.
वर्षांच्या सुरूवातीला म्हणजेच 1 जानेवारीला रविवारची (Sunday) सुट्टी असल्याने बँक कर्मचाऱ्यांना नववर्षाचा आनंद लुटता येणार आहे. तर 8 जानेवारी हा दुसरा रविवार, 14 जानेवारीला महिन्याचा दुसरा शनिवार, 15 जानेवारीला तिसरा रविवार, 22 जानेवारीला चौथा रविवार, 28 जानेवारीला चौथा शनिवार आणि 29 जानेवारीला पाचवा रविवार असणार आहे.
आणखी वाचा- Maharashtra : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
दरम्यान, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) संपुर्ण देशात सुट्टी असणार आहे. तर यासोबतच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी 2 जानेवारीला आयझॉलमध्ये (Aizawl) बँका बंद राहतील. गान-नागाई, मोइनू इरतपामुळे 3 आणि 4 जानेवारीला इंफाळमध्ये बँका बंद राहणार आहे. चेन्नईमध्ये 16 आणि 17 जानेवारीला तिरुवल्लुवर डे आणि उझावर तिरुनालच्या निमित्ताने बँका बंद राहतील.