हादरवणारी घटना! तरुणीला डांबून Po*n शूट करण्याचा माय-लेकाचा प्रयत्न; छळ करुन तिच्या गुप्तांगात...

Crime Agianst Women: मागील अनेक महिन्यांपासून ही तरुणी या दोघांच्या ताब्यात होती. तिचा या माय-लेकाने फार छळ केल्याचं आता समोर आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 10, 2025, 10:50 AM IST
हादरवणारी घटना! तरुणीला डांबून Po*n शूट करण्याचा माय-लेकाचा प्रयत्न; छळ करुन तिच्या गुप्तांगात...
अनेक महिने सुरु होता तरुणीचा छळ (डावीकडे आरोपी श्वेता खान, उजवीकडे आरोपी आर्यन खान)

Crime Agianst Women: पश्चिम बंगालमधील हावडा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील हावडामध्ये एका महिलेला मागील सहा महिन्यांपासून डांबून ठेवण्यात आलं होतं. या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या महिलेवर अश्लील व्हिडीओ शूट करण्यासाठी दबाव टाकला जात होता. एका तरुणाने आणि त्याच्या आईने या महिलेला डांबून ठेवलं होतं. तिने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली आहे.

जेवायलाही देत नव्हते

नॉर्थ 24 परगना जिल्ह्यातील या महिलेला डांबून ठेवलेलं असताना अनेक दिवस तिला साधं जेवायलाही दिलं जात नव्हतं. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या अत्याचारामध्ये तिच्या हाताची काही हाडं तुटली असून काही दातही तुटले आहेत. ही तरुणी आर्यन खान नावाच्या तरुणाला भेटली. त्याने या महिलेला हावडामध्ये नोकरी देतो असं आमिष दाखवलं. सध्या करतेस त्यापेक्षा अधिक चांगल्या पगाराची ही नोकरी असल्याचं या महिलेला सांगण्यात आलं.

पीडित तरुणी

एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये ही पीडित तरुणी काम करत होती. मात्र आर्यनच्या अमिषाला भुलून ती हावडाला जाण्यास तयार झाली. मात्र हावड्याला आल्यानंतर या महिलेला नोकरी देण्याऐवजी तिला एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आलं. आरोपीने या महिलेला नोकरी देण्याऐवजी बार डान्सर म्हणून काम करणार असशील तर तुला रुममधून बाहेर जाण्याची मुभा मिळेल असं सांगितलं होतं.

गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड घुसवण्याचाही प्रयत्न

आरोपी आर्यन आणि त्याची आई श्वेता खान या दोघांनाही अनेक महिने या महिलेचा छळ केला. या दोघांनी या तरुणीच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड घुसवण्याचाही प्रयत्न केला. या दोघांना विरोध करताना अनेकदा झालेल्या झटापटीमध्ये या तरुणाला अनेक जखमा झाल्या असून ती अनेकदा डोक्यावर पडल्याने बेशुद्धही झाली. 

मृत्यूशी देतेय झुंज

मागील आठवड्यामध्ये या माय-लेकाला चकवा देत ही पीडिता त्या फ्लॅटमधून पळून जाण्यात यशस्वी ठरली. तिला सागोर दत्त मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिने सर्व घटनाक्रम पोलिसांना दिलेल्या जबाबामधून नोंदवला आहे. पोलिसांनी या महिलेचा जबाब आणि तिच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

घरावर छापा पण...

पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा मारला. मात्र या ठिकाणाहून माय-लेकाने आधीच पळ काढल्याचं समोर आलं. आता या दोघांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आळ्या आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे.

माय-लेकाची कृष्णकृत्यं

वयाची चाळीशी ओलांडलेली श्वेता आणि आणि 26 वर्षीय आर्यन हे दोघे इशारा प्रोडक्शन नावाची कंपनी चालवतात. इव्हेंट मॅनेमजमेंटच्या नावाखाली हे दोघे या कंपनीच्या माध्यमातून तरुणांना देहविक्रेय व्यवसायात ढकलतात अशी प्रथामिक माहिती समोर आली आहे.