Bengaluru BIKE Taxi Driver Viral Video: भारतात बाईक टॅक्सीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कार ऐवजी लोक आता बाइक टॅक्सीनं प्रवास करणं पसंत करतात. त्यात सगळ्यात मोठं कारण हे असतं की बाइक ट्रॅफिकमध्ये पटकणं पुढे जाते आणि लवकरात लवकर तुम्ही ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी पोहोचू शकतात. दरम्यान, बाइक टॅक्सीची वाढती मागणी आणि वाढत्या भाड्याचा फायदा हा बाइक चालकांना अर्थात ड्रायव्हरला होतोय. तुम्हाला माहितीये का की हे बाइक ड्रायव्हर किती पैसे कमावत आहेत. ते ऐकूण तुम्हालाही मोठा धक्का बसेल. पेटीएमचे फाऊंडर विजय शेखर शर्मानं एक व्हिडीओ शेअर करत बाईक टॅक्सी चालक महिन्याला किती कमावतात याचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय शेखर शर्मानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात बाईक टॅक्सी ड्रायव्हरच्या कमाई विषयी सांगितलं. बंगळुरूमध्ये उबर आणि रॅपिडोसोबत बाइक टॅक्सी चालवणारे ड्रायव्हरनं दावा केला आहे की ते दर महिन्याला 80,000 ते 85,000 रुपये कमावतात. 



हेही वाचा : कोणत्या नोटेवर नसते RBI गव्हर्नरची सही?


ड्रायव्हरनं सांगितलं की तो जवळपास 13 तास काम करतोय. एकानं सांगितलं की यावर आश्चर्य व्यक्त करत सांगितलं की जितका हा बाईक ड्रायव्हर कमावतो तितके पैसे नोकरी करणारा व्यक्ती सुद्धा महिन्याला कमावत नाही. खरंतर, बाइक टॅक्सी ड्रायव्हरच्या कमाईला घेऊन केलेल्या या दाव्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, प्रत्येक शहराच्या हिशोबानं ड्रायव्हरची कमाई ही वेगवेगळी असते. तर एका नेटकऱ्यानं बाइक ड्रायव्हरची कमाई ही वेगळी असू शकते. दुसरा नेटकरी म्हणाला, सर रोज 13 तास ड्राइव्ह करणं सोपं नाही. हे प्रेरणादायी आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, ही आहे डिजीटल इंडियाची ताकद. पण आरोग्यावर याचा काय परिणाम होतो? काही नेटकऱ्यांनी संशय व्यक्त केला की हा व्हिडीओ किंवा इतकं प्रत्येक ड्रायव्हर कमावत असेल असं नाही. हे दावे किती खरे आहेत? आणि 80,000 रुपये ही काय नेट इनकम आहे? खूप प्रश्नांची उत्तर देनं बाकी आहे. इंटरनेटवर फेक नरेटिव्सचा बोलबाला असतो. दरम्यान, आता या व्हायरल व्हिडीओवरून खूप चांगलीच चर्चा सुरु आहे.