'S*x साठी पैसे मागते पत्नी, सासरीची मंडळी...', पतीची पोलिसात तक्रार; पत्नी म्हणाली, 'बेडरुममध्ये...'

Wife Demands Money For Intimacy: पत्नीच नाही तर तिच्या घरचेही आपल्याकडून वारंवार पैशांची मागणी करत असल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 22, 2025, 11:55 AM IST
'S*x साठी पैसे मागते पत्नी, सासरीची मंडळी...', पतीची पोलिसात तक्रार; पत्नी म्हणाली, 'बेडरुममध्ये...'
पतीने तक्रार दाखल केल्यानंतर पत्नीनेही केली तक्रार (प्रातिनिधिक फोटो)

Wife Demands Money For Intimacy: कर्नाटकमधील एका सॉफ्टवेअर कंपनी काम करणाऱ्या व्यक्तीने पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पत्नी पैशांची मागणी करत असल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पत्नीने पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. वायल्लीकल्लव पोलीस स्थानकामध्ये पतीने तक्रार दाखल केली असून पत्नी ब्लॅकमेल करत असल्याचं म्हटलं आहे. 

मॅट्रोमोनिअल साईटवरुन लग्न जुळलं

पत्नी मला ब्लॅकमेल करते, माझा छळ करते, माझ्यावर आर्थिक तणाव टाकून मला मानसिक दृष्ट्‍या आणि शारीरिक दृष्ट्‍या छळते असं या व्यक्तीने तक्रारीत म्हटल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे. तक्रारदार व्यक्तीचं नाव श्रीकांत असं असून त्याच्या पत्नीचं नाव बिंदूश्री असं आहे. दोघे मॅट्रोमोनिअल साईटवरुन एकमेकांना भेटले आणि त्यांचं ऑगस्ट 2022 मध्ये लग्न झालं. 

शरीरसंबंध ठेवायचे असतील त्या दिवशी 5 हजार मागते

लग्न होण्याआधीच बिंदूश्रीच्या आईने पैशांची मागणी केली होती असं श्रीकांतचं म्हणणं आहे. मी माझ्या सासूच्या खात्यावर 3 लाख रुपये पाठवले होते. त्यानंतर लग्नाच्या खर्चात हातभार लावण्यासाठी मी त्यांना पुन्हा 50 हजार पाठवलेले असंही श्रीकांतने म्हटलं आहे. लग्नाला दोन वर्षांहून अधिक कालावधी झाला असला तरी पत्नी माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवायला तयार होत नाही. माझ्याशी शरीरसंबंध ठेवायचे असतील तर दर दिवसाचे 5 हजार रुपये द्यावे लागतील असं पत्नी सांगते, असा आरोपही श्रीकांतने केला आहे. मी तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती आत्महत्या करेन अशा धमक्या देत असल्याचं श्रीकांतने म्हटलं आहे. मी जवळीक करायला गेल्यावर ती मला मी आत्महत्येच्या चिठ्ठी तुझं नाव लिहून जीव देईन असं धमकावत असल्याचं श्रीकांत म्हणाला आहे. माझ्या गुप्तांगावर हल्ला करुन मला मारण्याचा प्रयत्नही पत्नीने केल्याचा दावा श्रीकांतने केला आहे. 

75 हजारांचा लोनचा हफ्ता मागतात सासरची मंडळी

पत्नीचे कुटुंबीयही आपला मानसिक छळ करतात आणि आपल्याकडून पैसे उकळतात असं श्रीकांतचं म्हणणं आहे. 'माझ्या पत्नीच्या आणि तिच्या आईच्या नावावर असलेल्या घराच्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सासरची मंडळी माझ्याकडे दर महिना 75 हजार रुपयांची मागणी करतात,' असं श्रीकांतचं म्हणणं आहे. घरुन काम करताना मिटींग सुरु असल्यास पत्नी मला त्रास देण्यासाठी मुद्दाम गोंधळ घायलाची तर कधी ती माझ्यामागे नाचायची. त्यामुळेच माझी नोकरी गेल्याचंही श्रीकांतने म्हटलं आहे. मी या साऱ्याचे व्हिडीओ पुरावे म्हणून रेकॉर्ड करुन ठेवलेत, असंही श्रीकांतने म्हटलं आहे.

पोटगी म्हणून 45 लाख रुपये हवेत

पत्नीपासून मला घटस्फोट हवा असून याबद्दल तिच्याशी चर्चा केली तेव्हा तिने घटस्फोट हवा असेल तर पोटगी म्हणून 45 लाख रुपये द्यावे लागतील असं मला सांगितल्याचं श्रीकांतचं म्हणणं आहे. 

पत्नीचं म्हणणं बेडरुममध्ये कॅमेरा लावण्याची धमकी देतात सासरची मंडळी

श्रीकांतने तक्रार दाखल केल्यानंतर त्याची पत्नी बिंदूश्रीनेही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. आपला शारीरिक छळ केला जात असल्याचं तिचं म्हणणं आहे. मला एखाद्या मोलकरणीसारखं वागवलं जात असं बिंदूश्रीने म्हटलंय. हुंड्यासाठी सासरची मंडळी माझा छळ करतात. त्यांनी मला तुझ्या बेडरुममध्ये कॅमेरा बसवू अशा धमक्या दिल्याचंही बिंदूश्रीने तक्रारीत म्हटलं आहे. "तिला गरोदर कर म्हणजे ती सोडून जाणार नाही," असा सल्ला दिराने पतीला दिल्याचा बिंदूश्रीचा दावा आहे. मी या छळाला कंटाळून माहेरी गेली होते. मात्र सर्व काही नीट होईल या आपेक्षेने परत आले तरी परिस्थिती जैसे थेच आहे, असं बिंदूश्रीने म्हटलं आहे. पोलिसांनी बिंदूश्री आणि श्रीकांतला चौकशीसाठी बोलावले आहे.