कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 29 वर्षीय महिलेचे 30 तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी एका संशयिताची ओळख पटवली आहे, जो पश्चिम बंगालमध्ये असण्याची शक्यता आहे, बेंगळुरूतील एका महिलेच्या हत्येप्रकरणाला एक वेगळच वळण मिळालं आहे.
29 वर्षीय महालक्ष्मीचा मृतदेह 21 सप्टेंबर रोजी तिच्या बेंगळुरू येथील फ्लॅटच्या रेफ्रिजरेटरमध्ये 40 तुकडे केलेल्या अवस्थेत सापडला होता. परमेश्वरा म्हणाले, 'पश्चिम बंगालमधील एक व्यक्ती संशयित असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महालक्ष्मी बेंगळुरूच्या व्यालीकवल भागात एका बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. महालक्ष्मी विवाहित होती, पण पतीपासून वेगळी राहत होती. घटनेची माहिती मिळताच महिलेचा पतीही घटनास्थळी आला.
महिलांच्या सुरक्षेबाबतच्या चिंतेबाबत, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी लोकांना आश्वासन दिले की, सर्व आवश्यक उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. ते म्हणाले, 'आम्ही सीसीटीव्ही लावले आहेत आणि सुरक्षेसाठी इतर उपायांवरही विचार करत आहोत.'
बेंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त बी दयानंद यांनी सांगितले की, 'जोपर्यंत व्यालिकावल प्रकरणाचा (महालक्ष्मी खून खटला) संबंध आहे, आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. हा गुन्हा करणाऱ्या मुख्य संशयिताची ओळख पटली आहे. एकच गोष्ट आहे की आम्ही त्याला अजून पकडू शकलो नाही. त्या व्यक्तीला पकडून त्याची चौकशी पूर्ण झाल्यावर पुढील माहिती देता येईल. दयानंद म्हणाले, 'तो दुसऱ्या राज्यातील आहे, पण बेंगळुरूमध्ये राहतो. आम्ही सध्या जास्त माहिती देऊ शकत नाही कारण त्यामुळे आरोपींना मदत होऊ शकते.
महालक्ष्मीचे कुटुंब नेपाळचे आहे, परंतु 35 वर्षांपूर्वी ते कर्नाटकातील नेलमंगला येथे स्थायिक झाले. महालक्ष्मीच्या पतीने पीटीआयला सांगितले की, 'इमारतीच्या मालकाने मला सांगितले की, घरात दुर्गंधी येत आहे. मी येऊन दरवाजा उघडला तेव्हा मला महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे पडलेले दिसले. रक्षाबंधन सणाच्या वेळी आम्ही शेवटचे भेटले होतो. तेव्हापासून तिचा फोन बंद आहे. मृत महालक्ष्मी यांच्या पतीने सांगितले की, 'महालक्ष्मीचे अश्रफ नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते आणि ते दोघेही त्यांच्या फ्लॅटमध्ये एकत्र वेळ घालवत असत. तो सलूनच्या दुकानात काम करतो.