पाकिस्तानकडून ZEE NEWS चा सर्व्हर हॅक करण्याचा कट, नेमकं काय घडलंय?

Cyber Attack on Zee News: पाकिस्तानकडून Zee News वर सायबर अटॅक करण्याचा प्रयत्न झालाय.

प्रविण दाभोळकर | Updated: May 20, 2025, 03:22 PM IST
 पाकिस्तानकडून ZEE NEWS चा सर्व्हर हॅक करण्याचा कट, नेमकं काय घडलंय?
झी न्यूज सायबर अटॅक

Cyber Attack on Zee News: पाकिस्तानकडून Zee News वर सायबर अटॅक करण्याचा प्रयत्न झालाय. झी न्यूज वरील संभाव्य सायबर अटॅक निकामी करण्यात आलाय. पाकिस्तानमधून झी न्यूजवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. झी न्यूजच्या बातमीमुळे पाकिस्तान चिडलाय. त्यामुळे असे कारनामे करत असल्याचे म्हटले जात आहे.

भारताविरोधात पाकिस्तानच्या कारवाया दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पाकिस्तानचे वाईट हेतू जगासमोर आणणाऱ्या ZEE NEWS वर थेट सायबर हल्ला करण्यात आलाय. पण हा हल्ला हाणून पाडण्यात आलाय. पाकिस्तानचा हा अयशस्वी प्रयत्न झी न्यूजच्या तीन केंद्रांवर (मुंबई, भोपाळ आणि पटना) दिसतो. ZEE NEWS हा आधीच पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या डोळ्यात काटा बनलाय. कारण झी न्यूजने नेहमीच जगाला पाकिस्तानबद्दलचे सत्य सांगत असतो.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान झी न्यूज पाकिस्तानच्या वाईट हेतूंबद्दलची माहिती जगाला देत ​​होते. तेव्हा शाहबाज शरीफ यांच्या सरकारने त्यांच्या देशात झी न्यूजवर बंदी घातली होती. पण पाकिस्तानचे लोक अजूनही ZEE NEWS पाहत होते. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले.