नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान एखाद्या व्यक्तीपुढे नतमस्तक होणं ही काही लहान बाब नाही. हा क्षण नुकताच सर्वांनी अनुभवला. जेव्हा 125 वर्षीय योग चिकित्सक स्वामी शिवानंद यांना सोमवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री देत सत्कार करण्यात आला. (baba shivanand )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील सर्वात वयोवृद्ध पद्म पुरस्कार विजेते म्हणूनही आता स्वामी शिवानंद यांचा उल्लेख करण्यात येत आहे. 


एएनआय या वृत्तसंस्थेनं स्वामी शिवानंद यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचकाच्या दिशेनं जाण्यासाठी म्हणून शिवानंद स्वामी उठले आणि सर्वप्रथम त्यांनी नतमस्तक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन केलं. 


राष्ट्रपतींपाशी पोहोचल्यानंतरही त्यांनी नतमस्तक होत त्यांना अभिवादन केलं. त्यांची शरीरयष्टी आणि सुदृढ प्रकृती सर्वांनाच थक्क करुन गेली. 


1896 मध्ये जन्मलेले बाबा शिवानंद हे बंगालहून काशीला पोहोचले होते. गेली कैक दशकं ते काशीतील घाटांवर योगाभ्यास आणि योग शिक्षा देत आहेत. 



स्वामी शिवानंद यांचा पुरस्कार स्वीकारतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडीओ सर्वांचीच मनं जिंकणारा ठरत आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?