Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजप नंबर वन पक्ष झाला आहे. त्यामुळे बिहारमध्ये एनडीए प्रचंड विजयासह सरकार स्थापनकडे वाटचाल करत आहेत. समोर येणारे ट्रेंड हे राज्याच्या राजकारणात भाजपसाठी एक अतिशय सकारात्मक संकेत मानले जात आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू तीन दशकांहून अधिक काळ बिहारमध्ये भाजपचा मित्रपक्ष आहे. पण, नितीश कुमार यांनी कधीकधी पाठ फिरवून पक्षाला अडचणीत देखील आणलं आहे. पण जर अंतिम निकाल यावेळी निवडणुकीच्या ट्रेंडशी सुसंगत राहिला, तर नितीश कुमार भाजपला सोडले तरी बिहारमध्ये त्यांना आव्हान देऊ शकणार होणार नाहीय.
गेल्या चार निवडणुकांमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री बनले आहेत. जेव्हा जेव्हा जेडीयूने कमी जागा जिंकल्या आहेत, तेव्हा सरकारमध्ये भाजपचे वर्चस्व वाढले आहेत. तर गेल्या 25 वर्षांत तिसऱ्यांदा भाजप एनडीएमध्ये सर्वात मोठा पक्ष बनला तर आहेच, तर जेडीयूशिवायही, ते एनडीएच्या इतर मित्रपक्षांसह जादूचा आकडा ओलांडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नितीश कुमार यांना बिहारमध्ये भाजपसोबत कोणत्याही प्रकारच्या करारावर वाटाघाटी करणे कठीण होते.
भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने वारंवार सांगितलं आहे की, निवडणुकीचे निकाल काहीही असोत, नितीश कुमार हे आघाडीचा चेहरा रहणार आहे. जेडीयूनेही पुन्हा सांगितलं आहे की, नितीश कुमार मुख्यमंत्री असणार आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की 2020 च्या तुलनेत जवळजवळ दुप्पट जागा जिंकूनही, सत्तेची गती पूर्णपणे जेडीयूकडून भाजपकडे सरकली आहे दिसून आले आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांची स्थिती महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सारखी होईल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More
LIVE|
WI
92/2(27 ov)
|
VS |
NZ
|
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.