Bihar Election Result Laadki Bahin: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच विक्रमी बहुमत मिळालं आहे. बिहारमध्ये एनडीएच्या त्सुनामीत काँग्रेस आणि राजदप्रणित महागठबंधनचा सुपडा साफ झाला आहे. विरोधकांच्या दारुण पराभवाला कारणीभूत ठरलेल्या मुख्य घटकांपैकी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना एक ठरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर नितीश सरकारनं ही योजना जाहीर केली. योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला 10 हजार रुपयांचं अनुदान तसंच उद्योगासाठी 2 लाख रुपयांच्या अनुदानाची घोषणा करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर 75 लाख महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपयेही टाकण्यात आले. याचा परिणाम मतदानात दिसून आला. महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला. 70.60 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. साहजिकच निवडणुकीत महिला रोजगार योजनेचा फायदा सत्ताधा-यांना झाल्याचं पाहायला मिळालं.
महिलांना थेट रोख रकमेस्वरुपात दिलेल्या लाभामुळं मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आता बिहारमध्ये सत्ताधा-यांना फायदा झाला आहे. ही योजना देशातल्या अनेक राज्यांतल्या निवडणुकीत गेमचेंजर ठरल्यानं आता विरोधकांनीही याचा विचार करायला हवा असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं आहे.
"तीन, चार मुद्द्यांचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. सरकारने महिलांसाठी आणि बेरोजगारांसाठी योजना आणली होती. 10 हजार अनेक खात्यात टाकण्यात आले. भाजपानेही लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्रात फायदा झाल्याचं सांगितलं आहे. मध्य प्रदेशचं सरकारही त्यांना क्रेडिट देत आहे. दिल्लीमधील वृत्तपत्रात माझ्या वाचनात आलं की, मध्य प्रदेशात लाडकी बहिणचे पैसे वाढवणार आहेत. ते 2028 पर्यंत चालणार आहे, कारण तेव्हा त्यांची विधानसभा असेल. हा योगायोगही असू शकतो. याचा परिणाम झाला का याचाही विचार करावा लागेल. अनेक पैलू असून, ते तपासावे लागणार आहेत," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या राज्यात महिलांमध्ये लोकप्रिय ठरतेय. बिहारमध्येही लाडकी बहीण योजनेमुळं सत्ताधा-यांना पुन्हा सत्तासोपान चढता आला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सत्ताधारी अवजड होत असली तरी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा विचार करणार नाही असं वाटू लागलं आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.