नवी दिल्ली : उत्तर पूर्व राज्य मिजोरामच्या स्थानिक निवडणुकीत भाजपा आणि कॉंग्रेसने हातमिळवणी केली. दोन्ही पक्ष सत्तेच्या जवळ पोहोचूनही निवडणुक हारल्याने विरोधी पक्षाने सत्ता मिळविली. भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसने मिझोरामच्या चकमा स्वायत्त जिल्हा परिषद (सीएडीसी) साठी झालेल्या निवडणुकीत एकमेकांचा हात पकडला आहे. निवडणुकीत कॉंग्रेसने ६ तर भाजपा ५ जागांवर जिकंली. तर मिजो नॅशनल फ्रेंट (एमएनएफ) ने सर्वात जास्त आठ जागांवर विजय मिळविला. यामुळे सत्ता मिळविण्यासाठी लागणाऱ्या ११ सीट्सपासून पार्टी दूर राहिली. कॉंग्रेस किंवा भाजपाला बहुमत मिळाले नाही. दोन्ही पार्टीच्या नेत्यांनी निवडुकीनंतर एकत्र येत सत्ता मिळविली. सीएडीसीसाठी २० एप्रिलला मतदान करण्यात आलं होतं.
भाजपा आणि मिझोराम नॅशनल फ्रंटला बहुमत मिळालय आणि दोघे मिळून सत्ता चालवतील असे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुक निकालानंतर मंगळवारी म्हटले होते. पण निवडणुक निकालानंतर भाजपा नेत्यांना आपली स्टॅटर्जी बदलावी लागली. मिजोराम उत्तर पूर्वचे एकमेव राज्य आहे जिथे कॉंग्रेसची सत्ता आहे. भाजपाचे संती जीबान चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेचे नेता तर कॉंग्रेसचे बुद्ध लीला चकमा सदनाचे उपनेता होणार असल्याचेही वृत्त आहे. सीएसडीसी एक स्वायत्त परिषद आहे.