बिहार निवडणुकीसाठी भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील 3 नेत्यांचा समावेश, तिसरं नाव वाचून वाटेल आश्चर्य

BJP Star Campaigners List for Bihar Election: बिहार निवडणुकीसाठी भाजपाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 16, 2025, 06:39 PM IST
बिहार निवडणुकीसाठी भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील 3 नेत्यांचा समावेश, तिसरं नाव वाचून वाटेल आश्चर्य

BJP Star Campaigners List for Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, आता सर्व पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती, जागा वाटप यांचीही चाचपणी सुरु झाली आहे. तसंच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान भाजपाने बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 नेत्यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

बिहार निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, गिरीराज सिंह, योगी आदित्यनाथ, रेखा गुप्ता, मोहन यादव, हिमंत बिस्वा शर्मा, स्मृती इराणी, केशव प्रसाद मौर्य आणि सी. आर. पाटील यांना स्टार प्रचारक करण्यात आलं आहे. 

तसंच सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, रेणु देवी, नित्यानंद राय, मनोज तिवारी, रवी किशन, रवीशंकर प्रसाद आणि दिनेश लाल ‘निरहुआ’ यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील तीन नेत्यांचा समावेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे. तसंच बिहार विधानसभा प्रभारी विनोद तावडे देखील स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील बिहारमध्ये प्रचार करणार आहेत. 

 

FAQ

1)  बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक काय आहे?
बिहार विधानसभा निवडणुकीचे पहिले टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर २०२५ रोजी (१२१ जागांसाठी) आणि दुसऱ्या टप्प्यातील ११ नोव्हेंबर २०२५ रोजी (१२२ जागांसाठी) होईल. मतमोजणी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल. निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी हे वेळापत्रक जाहीर केले आहे. विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपेल.

2) प्रमुख राजकीय आघाड्या कोणत्या आहेत आणि त्यांचे जागावाटप कसे आहे?
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए): भाजप (१०१ जागा), जनता दल (युनायटेड) [जेडीयू] (१०१ जागा), लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) [एलजेएसपी(आरव्ही)] (२९ जागा), हिंदुस्थानी अवाम मोर्चा (६ जागा) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (६ जागा) यांचा समावेश. भाजपने तिसऱ्या यादीत १८ उमेदवार जाहीर करून एकूण १०१ उमेदवारांची यादी पूर्ण केली आहे. जेडीयूने दुसऱ्या यादीत ४४ उमेदवार जाहीर करून एकूण १०१ पूर्ण केले आहेत.
महागठबंधन (एमजीबी): राष्ट्रीय जनता दल [आरजेडी] (४५ जागा), काँग्रेस (२२ जागा), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया [सीपीआय] (६ जागा) यांचा समावेश. मात्र, सीट वाटप अजून पूर्ण झालेले नाही; काँग्रेसने १० हून अधिक उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी अंतिम करार बाकी आहे. राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांच्याशी बोलून सीट वाटपातील अडथळा सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

3) इतर प्रमुख पक्ष आणि त्यांचे जागावाटप कसे आहे?
ग्रँड डेमोक्रॅटिक अलायन्स (जीडीए): ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन [एआयएमआयएम] (३२ जागा), राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष [आरएलजेएसपी] आणि आजाद समाज पार्टी (२५ जागा) यांचा समावेश.
इतर पक्ष: जन सुराज पार्टी [जेएसपी] (२४३ जागांवर लढणार, ११६ जागांसाठी उमेदवार जाहीर), आम आदमी पार्टी [आप] (२४३ जागांवर, ५९ जागांसाठी जाहीर), बहुजन समाज पार्टी [बसपा] (८८ जागा) इत्यादी. प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचे संस्थापक स्वतः उमेदवारी लढवणार नाहीत.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More